Breaking

सोमवार, ८ मार्च, २०२१

बीड मध्ये भीषण अपघात रिक्षाला धडक दिल्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने पुढे अनेकांना चिरडलं 5 ठार, 7 जखमी



बीड मध्ये भीषण अपघात रिक्षाला धडक दिल्यानंतर घाबरलेल्या ट्रक चालकाने पुढे अनेकांना चिरडलं  5 ठार, 7 जखमी
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे

बीड: भरधाव वेगातील ट्रक चालकाने बीड-परळी महामार्गावर हैदोस घातला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोराची धडक दिल्यानंतर या ट्रक चालकाने पळून जाताना पुन्हा एका दुचाकीसह टाटा एसी गाडीला भीषण धडक दिली.या तिहेरी अपघातात रिक्षातील पाच जण ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत.मृतांमध्ये 2 लहान बालकांचा व 3 महिलांचा समावेश आहे. हा अपघात बीड - परळी महामार्गावरील मोची पिंपळगाव फाटा ,घोडका राजुरी फाटा या दोन ठिकाणी झाला आहे, तर पुढे गेल्यानंतर ट्रक देखील पलटी झाला आहे.सध्या अपघातातील जखमींवर बीड जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा