Breaking

सोमवार, १ मार्च, २०२१

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न..*



*आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न..*
 रुपेश डोलारे तुळजापूर प्रतिनिधी रुपेश डोलारे, उस्मानाबाद

      शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव कळंबचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मित्र परिवार तुळजापूर तालुका आयोजित करण्यात आलेल्या आमदार क्रिकेट चषकाचे पारितोषिक वितरण समारंभ धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला.यावेळी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश(दादा)राजेनिंबाळकर यांच्या हस्ते प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पारितोषिक वितरित करण्यात आले.
यामध्ये प्रथम पारितोषिक 11स्टार हंगरगा तुळ,द्वितीय छञपती क्रिकेट क्लब चिंचोली तृतीय राजहंस क्रिकेट क्लब उळे,चतुर्थ बी.पी.एल क्रिकेट क्लब बेंबळी तसेच वैयक्तिक पारितोषिक देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव कळंबचे आमदार कैलास(दादा)पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयबापू सस्ते,पंचायत समिती सदस्य शाम(भैय्या)जाधव,तुळजापूर तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी,तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम,युवासेना जिल्हाचिटणीस लखन कदम परमेश्वर,शिवसेना उप तालुकाप्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण,शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर,युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे,माजी युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,अर्जुन(आप्पा) साळुंखे,सोशल मिडीया विभागप्रमुख सिद्रामप्पा कारभारी,येवती सरपंच अमोल गवळी,शंकर गव्हाणे,बालाजी पांचाळ,चेतन चव्हाण,हंगरगा  उपसरपंच अमोल नन्नवरे,आण्णाप्पा पवार,श्रावण पवार,पाराजी देवकर,माजी उपसरपंच दशरथ चौगुले,पञकार दिनेश सलगरे,अमिर शेख,लक्ष्मण माळी,फारूक शेख,किशोर चव्हाण,फुलचंद माने,सौरभ चव्हाण,वैभव चव्हाण,श्रीराम कुंभार आदींची प्रमुख उपस्थितीत होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा