Breaking

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

विठ्ठलवाडीच्या नूतन सरपंच संगीता अनिलकुमार अनभुले यांचा विशेष सत्कारइतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी केला सत्कार

विठ्ठलवाडीच्या नूतन सरपंच संगीता अनिलकुमार अनभुले यांचा विशेष सत्कार
इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी केला सत्कार

माढा / प्रतिनिधी -रेणुका रजपूत
AJ 24 Taas News नेटवर्क


 माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी या सुशिक्षित व शासकीय नोकरदारांच्या ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन तथा डीसीसी बँकेचे शाखाधिकारी अनिलकुमार मनोहर अनभुले यांच्या सुविद्य पत्नी संगीता अनभुले यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार वाकावचे प्रसिद्ध वक्ते तथा इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय प्राप्त केल्याबद्दल संगिता अनभुले यांच्याकडे सर्वानुमते सरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांचे माहेर वाकाव व सासर विठ्ठलवाडी येथील दोन्ही घराण्यांना राजकीय वारसा असून सामाजिक व इतर क्षेत्रातील सर्व विकासकामांबाबत विधायक दृष्टिकोन ठेवून त्यांनी कामकाज करावे तसेच गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी चेअरमन अनिलकुमार अनभुले व सरपंच संगीता अनभुले या दोघांनी गावातील सुज्ञ व जागरूक आणि विधायक दृष्टिकोन असलेल्या लोकांना सोबत घेऊन शैक्षणिक व सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजप्रबोधन करावे असे आवाहन इतिहास संशोधक डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी केले.

याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अनिलकुमार अनभुले,माजी सरपंच व प्रगतशील शेतकरी बालाजी गव्हाणे,पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे,पतसंस्थेचे उपाध्यक्ष नारायण खांडेकर,माजी चेअरमन भिमराव शिंगाडे,राजाभाऊ कदम, वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,तिरुपती कन्स्टक्शनचे धनाजी सस्ते,प्राथमिक शिक्षक सज्जन मुळे,विनय अनभुले, विशाल अनभुले यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता.माढा येथे नूतन सरपंच संगीता अनभुले यांचा सत्कार करताना डॉ.श्रीमंत कोकाटे बाजूला अनिलकुमार अनभुले, बालाजी गव्हाणे व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा