Breaking

शुक्रवार, १२ मार्च, २०२१

टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय मंजूरीबाबत बशीर जहागीरदार यांचा नागरी सत्कार *********************************** ******* 5 वर्षांचे पाठ पुराव्यास आखेर यश*




*टेंभुर्णी उपजिल्हा रुग्णालय मंजूरीबाबत बशीर जहागीरदार यांचा नागरी सत्कार*
*********************************
*5 वर्षांचे पाठ पुराव्यास आखेर यश*
********************************

टेंभुर्णी वार्ताहर : टेंभुर्णी येते गेली पाच वर्षापासुन जनतेची गरज ओळखून टेंभुर्णी येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे या मागणीसाठी 2016 पासुन टेंभुर्णीचे सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी अनेक अंदोलन,उपोषने करुन सदरची मागणीचा पाठपुरावा केला होता तसेच टेंभुर्णी ते मंत्रालय  पदयात्रेचा इशारा देखील दिला होता.त्यांनी केलेले अनेक अंदोलनाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र शासनाचे आरोग्य मंत्राल्याने विशेषबाब म्हणून टेंभुर्णी येथे 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णाल्याला आखेर 8 मार्च रोजी अधिवेशषणात मंजूरी दिली आहे.त्यामुळे टेंभुर्णी व परिसरातले गावांचा आरोग्याचा प्रश्न कायम मिटला असल्याने टेंभुर्णी व 40 गावातील ग्रामस्थांनी जल्लोष केला आहे. 

   आपले गावाला शासकीय दवाखाण्याची अत्यंत गरज असल्याचे ओळखून टेंभुर्णी येथील सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी सर्वप्रथम 2016 मध्ये जिल्हाधिकारी सोलापुर यांचे कार्यालयासमोर उपोषण केले होते,2017 साली मुंबई येते 3 दिवस आमरण उपोषण आजाद मैदानावर केले,त्यानंतर 2018 साली नागपुर अधिवेशन काळात 7 दिवस भर पावसात भिजत अधिवेषणात उपोषण केले होते त्या वेळेस आमदार बच्च कडू यांनी दखल घेत आधिवेषण मध्ये रुग्णाल्याचा मुदधा उपस्थीत केला होता.2018 साली परत मुंबई व 2019 मध्ये टेंभुर्णी येते बाबासाहेब अंबेडकर यांचे पुतळ्यासमोर देखील अंदोलन केले होते.रुग्णाल्याचे मागणीसाठी टेंभुर्णीकरांनी देखील गाव बंद केले होते. सततचा पाठपुरावा व या मागणीसाठी विविध नेत्यांना भेटून आपल्या गावात रुग्णालय नसल्याने किती परिस्थिती गंभीर आहे याची जाणिव जहागीरदार यांनी करुन दिली. टेंभुर्णी येथील व परिसरातले ग्रामस्थांसाठी उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठीचे हट्ट त्यांनी सोडले नाही.
      उपजिल्हा रुग्णालय मंजुरीसाठी महत्वाची भुमिका बजवणारे बशीर जहागीरदार यांचा टेंभुर्णी ग्रामस्थ व भाजपचे वतीने नागरी सत्कार करण्यात आले.करमाळा चौक येते शिवाजी महाराजांचे पुतळ्यासमोर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे,भाजपचे जिल्हा सचिव अमरसिहं शेंडे,नगेश बोबडे,तालुका सरचिटणीस गीरीष ताबे,भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे बाळासाहेब ढगे,ग्रा प सदस्य भाऊ महाडीक,जयवंत पोळ,आर पी आयचे अध्यक्ष रमेश लोंढे,सतीश नेवसे,सतीश काळे,सतीश लोंढे,भैया काळे,नगप्पा उन्ने,विजय साळवे,सर्व ग्रामस्थ व व्यापारी जास्त संख्येने उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा