विठ्ठलवाडीचे नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे यांचा विशेष सत्कार
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला सपत्निक सत्कार
माढा / प्रतिनिधी - रेणुका रजपूत
AJ 24 Taas News Maharashtra
माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य व श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श गोपालक पुरस्कार प्राप्त रामचंद्र (दादा) विठ्ठल भांगे यांचा सदस्यपदी निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सपत्निक सत्कार करुन तोंडभरून कौतुक केले आणि पुढील सामाजिक व राजकीय कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.
विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार दादा-मामा-भैय्या प्रेमी श्री विठ्ठल-बिरुदेव ग्रामविकास आघाडीचे उमेदवार रामचंद्र भांगे यांनी प्रथमच निवडणूक लढवून दणदणीत विजय प्राप्त केला त्याबद्दल माढा रोटरी क्लबचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.सुभाष पाटील व डॉ.उमा पाटील यांनी सत्कार केला.माढा तहसील कार्यालयाचे सेवानिवृत्त नायब तहसिलदार मारुती मोरे साहेब यांनीही सपत्निक सत्कार केला.संत माणकोजी प्रशालेचे सहशिक्षक औदुंबर शेंडगे यांनीही सत्कार केला.बार्शीचे माध्यमिक शिक्षक उदय पाटील व कुटुंबियांनी रामचंद्र भांगे व सुजाता भांगे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. विठ्ठलवाडी येथील तिरुपती कन्स्टक्शनचे धनाजी सस्ते व निष्ठावंत शिंदे समर्थक कैलास सस्ते यांनीही त्यांचा सत्कार केला.विठ्ठलवाडी येथील सनराईज यंग ब्रिगेड आणि कदम व जाधव परिवाराच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनंता जाधव व युवानेते रामभाऊ कदम यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी रोटरी क्लबचे प्रांतपाल डॉ.सुभाष पाटील म्हणाले की,नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे यांनी मिळविलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. विठ्ठलवाडी हे गाव सुशिक्षित व शासकीय नोकरदारांचे गाव आहे त्यामुळे भविष्यात रामचंद्र भांगे व इतर मान्यवरांच्या सहकार्याने रोटरीच्या माध्यमातून विविध आरोग्य विषयक,सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे यांनी सांगितले की, विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीचा कारभार अत्यंत पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्यासाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे भूमिका बजावणार आहे.गावातील गोरगरीब व गरजूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विविध शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे.जनतेच्या व मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून कामकाज करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या विविध ठिकाणच्या सत्काराप्रसंगी उपळाई खुर्दचे नूतन सरपंच संदिप (भैय्या)पाटील,पतसंस्थेचे चेअरमन अनिलकुमार अनभुले,माजी सरपंच बालाजी गव्हाणे,विठ्ठलवाडीच्या नूतन सरपंच संगीता अनिलकुमार अनभुले, नूतन सदस्य दिपाली बालाजी गव्हाणे, वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे, पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे, सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,महादेव (बापूराव) कदम,अशोक गव्हाणे,नेताजी कदम,सौदागर गव्हाणे,मोहन भांगे,दयानंद शेंडगे, सतीश गुंड,महेश नागटिळक,सतीश शेंडगे,रोहित भांगे,अमोल गव्हाणे, महेश भांगे,अक्षय कदम यांच्यासह ग्रामस्थ व युवक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता.माढा येथील नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे यांचा सत्कार करताना विविध क्षेत्रातील मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा