*धारपुडीच्या कालिकामाता देवीची यात्रा साध्या पध्दतीने साजरी होणार*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
धारपुडी ता. खटाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री कालिकामाता देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. पंरतु आताच्या कोरोना महासंकटामुळे व शासनाच्या नियमानुसार यात्रा साध्या पध्दतीने साजरी केली जाणार आहे.
यात्रे संदर्भात चर्चा करण्याकरिता कालिकामाता मंदिरात सर्व ग्रामस्थांची मिटींग आयोजीत करण्यात आली होती. सालाबादप्रमाणे कालिकामाता देवीची यात्रा शनिवार दि. ३ रोजी पार पडत असून यात्रेमध्ये फक्त धार्मिक रितीरिवाजानुसार विधीवत कार्यक्रम होणार आहेत. इतर कोणतेही करमणुकीचे कार्यक्रम होणार नाहीत असा एकमुखी निर्णय ग्रामस्थांमधून घेण्यात आला आहे. तसेच दरवर्षी होणारे पारायण सोहळा हा कार्यक्रम सुध्दा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी अशी पुजारी मंडळीकडून विनंती करण्यात येत आहे. मिटींगसाठी सर्व ग्रामस्थ, तरूण वर्ग व पुजारी मंडळी उपस्थित होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा