Breaking

सोमवार, ८ मार्च, २०२१

समाजात प्रत्येक क्षेत्रात महिलांना मानाचे स्थान मिळाले पाहिजे _ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे .




समाजात प्रत्येक क्षेत्रात महिलांना मानाचे स्थान मिळाले पाहिजे _ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे .


 कन्हेरगाव प्रतिनिधी /AJ 24 Taas

टेंभुर्णी परिसरातील प्रत्येक क्षेत्रातील , सगळ्याच राजकीय पक्षातील महिलांना तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दक्षता कमिटीमध्ये सामान सामावून घेऊन त्यांच्या प्रत्येक अडचणीला धावून जाणार असून , इथून पुढे आता प्रत्येकाने फक्त महिला दिनीच नाही तर प्रत्येक दिवशी , प्रत्येक क्षणाला सर्वच महिलांना समाजात मानाचे स्थान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी केले .
टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टेंभुर्णी तालुका माढा येथील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा सुरजा  बोबडे  होत्या . यावेळी भाजपच्या महिला मोर्चा च्या जिल्हा अध्यक्षा धनश्री खटके पाटील यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या . 
यावेळी सहाय्यक पोलीस फौजदार अभिमान गुटाळ ,  जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे , भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा धनश्री खटके पाटील , पोलीस नाईक विजय राजगुरू , पोलीस हवालदार अकलाख   शेख , पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद काटे ,पोलीस नाईक धनाजी शेळके ,पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका कोळी , जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष रत्नमाला शिंदे, माढा तालुका कार्याध्यक्ष पल्लवी गायकवाड ,जिल्हा संघटक विद्या देशमुख, आशा निमसे ,स्वाती गांधी, प्रिया गांधी, वंदना चौधरी ,मेघा जाधव, संजीवनी अरबोळे , जयश्री ताटे, सुरेखा पाटील, अंजली भोसले, छाया देशमुख आदी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा