राजूर येथे सत्येन स्पोट्स या खेळाच्या साहित्याच्या अद्यावत दुकानाचे उद्घाटन
जालना/ प्रतिनिधी : मनिषा मगरे
राजूर शहरात चनेगाव दाभाडी रोडवर बुधवारी (ता.24) सत्येन स्पोर्ट्स या अद्यावत दुकानाचे उद्घाटन जालना जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते पंडित दादा भूतेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना पंडित भुतेकर म्हणाले की राजूर परिसरात खेळाच्या साहित्याचे दुकान नव्हते त्यामुळे खेळाडूंना साहित्यासाठी मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत होती, मात्र आज या दुकानामुळे त्यांची गैरसोय दूर झाली आहे.
ज्ञानेश्वर पुंगले म्हणाले, की
आज प्रत्येकाला व्यायामाची नितांत गरज आहे, कारण त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. राजूर शहरात आणि परिसरात खेळाडूंच्या सोयी साठी सत्येन स्पोर्टस महत्वाचे ठरेल व नवोदित खेळाडू निर्माण होतील.
या उद्घाटन प्रसंगी राजूर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य कैलास पुगले, राजुरचे सरपंच भाऊसाहेब भुजंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर दानवे, अकोला सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य दत्तू पाटील पंडित, शेख मंजूर शेख मिर्झा, सत्येन स्पोट्स दुकानाचे मालक संजू चव्हाण, भारत चव्हाण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा