Breaking

गुरुवार, ११ मार्च, २०२१

चोरीस गेलेल्या स्कॉर्पियो आरोपीसह पोलिसांच्या ताब्यात....


चोरीस गेलेल्या स्कॉर्पियो आरोपीसह पोलिसांच्या ताब्यात....
श्रीगोंदा:नितीन रोही,

सविस्तर असे कि दिनांक १४ डिसेंबर २०२० रोजी रात्री १२:०० च्या सुमारास श्रीगोंदा शहरातुन एफ.जे.कार मल्टीसर्विस, गॅरेज, स्टेशन रोड श्रीगोंदा येथुन स्कॉर्पियो गाडी नं. एम.एच.१६. बी. एच. १६५३ चोरीस गेली होती. त्याबाबत फिर्यादी सचिन सुनिल शिंदे रा.आढळगाव ता.श्रीगोंदा यांनी महेंद्र बाजीराव महारनोर रा.वांगदरी याचेवर संशय असल्याने श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.क ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
सदर आरोपी महेंद्र बाजीराव महारनोर हा गुन्हा घडल्यापासुन फरार होता. दिनांक ८ मार्च रोजी श्री.रामराव ढिकले पोलिस निरीक्षक श्रीगोंदा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी महेंद्र हा ढोकराई फाटा श्रीगोंदा येथे एका चहाच्या दुकाना समोर बसलेला आहे. त्यावरुन सदरची माहीती  त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना देवुन सदर ठिकाणी जावुन आरोपीला ताब्यात घेण्यास सांगितले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता, एक इसम चहाच्या दुकाना समोर बसलेला दिसला. त्यास ताब्यात घेवुन नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव महेंद्र बाजीराव महारनोर रा.वांगदरी ता.श्रीगोंदा असे सांगितल्याने त्यास सदर गुन्ह्याचे अनुशंगाने विचारपुस केली. तर, सदरची स्कॉर्पियो गाडी त्याने चोरी केली असल्याची कबुली दिल्याने, सुमारे चार लाख पन्नास हजार रुपये किंमतीची स्कॉर्पियो गाडी जप्त करण्यात आली आहे.

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. आरोपी महेंद्र बाजीराव महारनोर याचे विरुध्द यापुर्वी पॉक्सो, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे विविध गुन्हे श्रीगोंदा, बेलवंडी, व पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री मनोज पाटील सो, (पोलीस अधिक्षक अहमदनगर), मा.श्री सौरभकुमार अग्रवाल सो, (अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर), मा.श्री अण्णासाहेब जाधव सो, (उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, स.पो.नि दिलीप तेजनकर, पो.हे.कॉ अंकुश ढवळे, पो.कॉ प्रकाश मांडगे, पो.कॉ दादा टाके, पो.कॉ किरण बोराडे, पो.कॉ संजय काळे, पो.कॉ गोकुळ इंगवले, पो.कॉ योगेश सुपेकर यांनी केली आहे.


फ़ोटो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा