Breaking

मंगळवार, ३० मार्च, २०२१

रमाई आवास योजनेच्या मंजूर निधिचा तपसील तातडीने पाठविण्यात यावा -वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख*



*रमाई आवास योजनेच्या मंजूर निधिचा तपसील तातडीने पाठविण्यात यावा -वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख* 

 जिल्हा प्रतिनिधि :जीवन भोसले (उदगीर) 

लातूर दि. 30 रमाई अवास योजना अंतर्गत  निधी  मंजूर करण्यात आला  असुन याबाबतचा विस्तृत तपशील तातडीने पाठविण्यात यावा अशा सुचना वैधकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज  दिल्या. 
लातूर जिल्हा रमाई घरकुल निर्माण समितीची आढावा बैठक आज वैधकीय शिक्षण तथा सांस्कृतीक  कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकिस पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री  संजय बनसोडे  यांच्यासह  रोजगार हमी  योजनेचे लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  लातूर समाज कल्याण अधिकारी ,आदी उपस्थित होते .
मंत्री श्री देशमुख म्हणाले की, राज्यातील  अनूसुचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांचा  निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरा ठिकाणी शासनामार्फत पक्के घर बाधून देण्यात  येत आहे. ग्रामीण क्षेत्रात  निवड केलेल्या अनुसुचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड करून घरकुल निर्माण  समिती पुनर्गठीत करण्यात आली आहे. या समितीमार्फत मंजूर कामांसाठी निधी मिळवण्यासाठी पाठपूरावा हि करण्यात येणार आहे.
 बैठकीत सन 2019-20 या वर्षातील  शिल्लक उद्दीष्टानुसार 2915 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली  तसेच सन 2020-21मधील 6827उदीष्टापैकी 1645 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली , सन 2020-21मधिल उर्वरीत उदीष्टांचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचना अमित देशमुख यांनी दिल्या .तसेच शहरी भागासाठी प्रलंबित असलेल्या 27 कोटी रुपये अपेक्षित निधीचा पाठपुरावा करण्याच्या  सुचना दिल्या ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा