*निलेश जाधव यांची खटाव तालुका मनसे अध्यक्ष पदी निवड*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
पुसेगाव ता खटाव येथील युवा नेते निलेश धनंजय जाधव यांची कोरेगाव विधानसभा मतदार संघ खटाव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र मनसे जिल्हाध्यक्ष धेर्यशील पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सचिन पवार, संघटक सुरज लोहार, सचिव राजेंद्र केंजळे, खटाव तालुकाध्यक्ष दिंगबर शिंगाडे, निखिल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
राजसाहेब ठाकरे यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवण्याचा व पक्ष वाढीसाठी आमचा प्रयत्न असेल तसेच पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबर अनेक मूलभूत सोयी सुविधा व वेळप्रसंगी जनतेच्या हितासाठी, लोकांच्या अडचणीसाठी लढा उभारू असेही यावेळी निलेश जाधव यांनी सांगितले.
यावेळी मनसे पदाधिकारी विकास फडतरे, प्रतिक माने, मुस्तफा कागदी, महेश धोंगडे, नवनाथ अवघडे, सागर कट्टे, संजय जाधव, अविनाश क्षीरसागर, धनंजय जाधव, अंकुश जाधव, घनश्याम मसणे, प्रथमेश नवले विश्वराज कट्टे, शंभूराज पाटील, संकेत पाटील, चैतन्य पाटील, अजय पालखी, चित्रसेन मुके, रणजीत कुमार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा