महाशिवरात्रीनिमित्त महादेव मळा बाभुळगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
माळशिरस (प्रतिनिधी): महाशिवरात्रीनिमित्त माळशिरस तालुक्यातील बाभुळगावच्या महादेव मळ्यातील शिव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
प्रारंभी सकाळी सव्वा सहा ते सव्वा सात पर्यंत मंदिराचे सर्वेसर्वा नामदेव कोंडीबा पराडे महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. शालन नामदेव पराडे यांच्या हस्ते मंदिरातील शिवलिंगास अभिषेक करून पूजा आरती करण्यात आली.
दिवसभर ग्रंथवाचन, फराळ वाटप झाले. रात्री ह. भ. प. सुग्रीव महाराज मिटकल यांचे सुश्राव्य किर्तन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा अकरा पासून महाप्रसाद वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर धार्मिक कार्यक्रम शासकीय नियमानुसार साजरा करण्याच्या दृष्टीने मास्क, रूमाल, स्ट्रोल स्कार्प, सॕनिटायझर, सुरक्षित अंतर व गर्दी याबाबत दक्षता घेण्यात आली होती असे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांनी देवस्थानच्या वतीने आमच्या प्रतिनिधीस सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा