तांबवे ग्रामपंचायतींच्या वतीने जागतीक महिला दिना" निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
चव्हाणवाडी प्रतिनिधी /अमोल भोसले,
पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मा.डाॅ.दिपक भोसले, आरोग्य सहाय्यका वैशाली नलवडे, आरोग्य सेविका मनिषा खोचरे, आशा वर्कर आशा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
महिला साठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पाच स्पर्धा मधून पहिल्या तिन विजेत्या महिलांना अनुक्रमे पैठणी साडी, ईडली पात्र,चहा काॅफी सेट असे एकूण पंधरा बक्षिसे देण्यात आली.
उपस्थित महिला भगिनींनी हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
ग्रामपंचायतींच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा मान सन्मान करण्यात आला. महिला अधिकारी यांना साडी भेट देऊन तर पुरूष अधिकारी यांना मानाचा फेटा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना योद्धा सौ.प्रिती काळे तलाठी तांबवे, डाॅ.दिपक भोसले उपकेंद्र आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यका वैशाली नलवडे, आरोग्य सेविका मनिषा खोचरे, आशा वर्कर आशा गोडसे, कृषी अधिकारी मा.अनिल कांबळे, मुख्याध्यापक ढवळे सर, अंगणवाडी सेविका पारूबाई खोमणे, मंगल देशमुख, सहशिक्षीका कुटे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बक्षिस वितरण समारंभ अॅड. सौ.धनश्री खटके पाटील जिल्हा अध्यक्षा सोलापूर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तथा ग्रामपंचायत सदस्या, सौ. निकीता नागेश खटके पाटील ग्रामपंचायत सदस्या, सौ.रेश्मा तांबोळी ग्रामपंचायत सदस्या,सरपंच सचिन दादा कांबळे, उपसरपंच सुजित भैय्या खटके पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन अशोक खटके पाटील, माजी उपसरपंच नागेश बापू खटके पाटील, शेती अधिकारी विजय खटके पाटील, संचालक सुधाकर खटके पाटील, माजी चेअरमन भजनदास नाना खटके पाटील, माजी उपसरपंच मधुकर खटके पाटील, हिंदवी स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष सागर भैय्या खटके पाटील तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनीं उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा