Breaking

रविवार, १४ मार्च, २०२१

अणदूरच्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम गजाआड



अणदूरच्या विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम गजाआड*
अणदूर, प्रतिनिधी - प्रतिक भोसले

अणदूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी लैंगिक अत्याचार केला होता, त्यातील तिसरा आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. आणि त्यातच अजुन एक अत्याचार घडल्याने अणदूरमध्ये खळबळ उडाली आहे.

लग्नाचे अमिष दाखवून  एका महिलेवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी  अल्ताफ लालडू इनामदार  याच्याविरुद्ध पोलिसांनी भा दं वि 376(2), 323,504,506 प्रमाणे  एफआयआर दाखल केला आहे. 

 या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सासरच्या त्रासाला कंटाळून माहेरी आलेली विवाहिता हि आपल्या आई सोबत राहून अणदुर येथे मोलमजुरी करुन जीवन जगत होती. तिला लग्नाचे अमिष दाखवुन मागील दोन वर्षांपासून अल्ताफ लालडू इनामदार हा लैंगिक अत्याचार करीत होता. 

दमदाटी करून आणि मारहाण करून आपल्या  इच्छेविरुद्ध  अल्ताफ लालडू इनामदार याने शारीरीक संबंध ठेवल्याची तक्रार संबंधित महिलेने नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिली आहे. त्या पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन नळदुर्ग पोलीस स्टेशन मध्ये अल्ताफ लालडू इनामदार याच्यावर भादंवि  376(2), 323, 504, 506 प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीस  अटक करण्यात आली आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा