Breaking

गुरुवार, ४ मार्च, २०२१

विठ्ठलवाडीच्या विकासकामांसाठी सर्वोतोपरी मदत करण्यास सदैव कटिबद्ध - इंडियन शुगरचे संचालक संदीप (भैय्या) पाटील ग्रामपंचायतींचे नूतन पदाधिकारी व गुणवत्तांचा सत्कार समारंभ



विठ्ठलवाडीच्या विकासकामांसाठी सर्वोतोपरी मदत करण्यास सदैव कटिबद्ध - इंडियन शुगरचे संचालक संदीप (भैय्या) पाटील

ग्रामपंचायतींचे नूतन पदाधिकारी व गुणवत्तांचा सत्कार समारंभ 
माढा / प्रतिनिधी - रेणुका रजपूत
AJ 24 Taas News Maharashtra नेटवर्क


विठ्ठलवाडी हे तालुक्यातील सुशिक्षित व शासकीय नोकरदारांचे गाव म्हणून ओळखले जाते त्यामुळे या गावातील पाणी,रस्ते आणि इतर मुलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच भविष्यात करावयाच्या विविध विकासकामांसाठी माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन इंडियन शुगरचे संचालक तथा उपळाई खुर्दचे नूतन सरपंच संदिप (भैय्या) पाटील यांनी दिले.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे निष्ठावंत शिंदे समर्थक आणि सस्ते परिवाराच्या तिरुपती कन्स्टक्शनच्या वतीने आयोजित सत्काराप्रसंगी बोलत होते.

अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन अनिलकुमार अनभुले होते.

प्रास्ताविक वाचनालयाचे श्री विठ्ठल सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.

याप्रसंगी उपळाई खुर्दचे नूतन सरपंच संदिप पाटील, विठ्ठलवाडीच्या सरपंच संगीता अनिलकुमार अनभुले, नूतन ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र भांगे‌ व दिपाली बालाजी गव्हाणे आणि राज्यस्तरीय हिंदी प्रचारक "भाषारत्न पुरस्कार" मिळाल्याबद्दल माध्यमिक शिक्षक बाळासाहेब कदम यांचा सत्कार तिरुपती कन्स्टक्शनचे धनाजी सस्ते व कैलास सस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विठ्ठलवाडीचे प्रगतशील शेतकरी माजी तथा सरपंच बालाजी गव्हाणे,तिरुपती कन्स्टक्शनचे धनाजी सस्ते,कैलास सस्ते,पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे,वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,महादेव कदम,नेताजी कदम,अशोक गव्हाणे,अनंता जाधव, शंभूराजे पाटील,सौदागर गव्हाणे सर,नेताजी उबाळे सर,शिवाजी कोकाटे,सतीश गुंड,महादेव टोणपे, दत्तात्रय खैरे,पांडुरंग खांडेकर,सतीश शेंडगे,गोपीनाथ तरंगे, कृषी सहाय्यक दयानंद शेंडगे,बबलू नागटीळक, अमोल गव्हाणे,दत्तात्रय काशीद, कैलास खैरे,अजित बरबडे,संदीप सस्ते,महेश भांगे,अक्षय कदम,वसंत बरबडे,ज्ञानेश्वर तरंगे,माधुरी सस्ते, स्वाती सस्ते,सुजाता भांगे,सरुबाई सस्ते यांच्यासह ग्रामस्थ व युवक आणि महिला उपस्थित होत्या.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा