नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत अशोक चव्हाणांचा प्रताप 21 पैकी 17 जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १२, राष्ट्रवादीने ४ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.
नांदेड जिल्हा बॅंकेच्या सभासदांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवून बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे. पुनःश्च सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन व मतदारांचे मनःपूर्वक आभार.
पालकमंत्री.अशोकरावजी चव्हाण
नांदेड जिल्हा प्रतिनिधी,बालाजी सिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा