बेंबळे येथे तातडीने मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे... सर्वतोपरी सहकार्य करू.............सरपंच विजय पवार
फोटो..
सिध्देश्वर शिंदे
बेंबळे AJ 24 Taas News
बेंबळे येथे कोरोना लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी बेंबळे चे सरपंच विजय पवार यांनी, नागरिकांच्या वतीने, निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची मुख्य प्रत परिते प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. यश सातपुते यांना दिलेली असून त्यांचे मार्फत माढा तालुका प्रमुख आरोग्य अधिकारी व मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. हे निवेदन देताना सरपंच पवार यांचे समवेत माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक काळे, विश्वजीतमालक भोसले, सिद्धेश्वर शिंदे, राजेंद्र जगताप, माजी सरपंच कैलास भोसले ,बबलु काळे.. आदी मान्यवर उपस्थित होते.
वृत्तांत असा की बेंबळे जिल्हा परिषद गटातील बेंबळे हे प्रमुख गाव असून गावची लोकसंख्या 12000 आहे. या परिसरात मिटकलवाडी, हरीनगर, भोसलेवाडी, घोटी, काळे वस्ती, बन वस्ती या सर्व ठिकाणांचा समावेश होतो. मार्च 2020 पासून करोना महामारीने थैमान घातल्यापासून मध्यंतरीच्या डिसेंबर 20 ते फेब्रुवारी 21 पर्यंतचे तीन-चार महिने सोडल्यास या परिसरात आतापर्यंत 25 ते 27 नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. अनेक नागरिक कोरोना पॉझिटिव निघाल्यानंतर देखील बरे होऊन परतले आहेत. मागील महिन्यापासून शासनाच्या मोफत कोविड लसीकरणाला प्रारंभ झाला असून बेंबळे हे परिते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येते. या ठिकाणी एक सुसज्ज असे शासकीय आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहे. सुरुवातीला परिते येथे सोय नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे लागले, परंतु आता परिते येथे लसीकरण सुरू झाले आहे ,परंतु या ठिकाणी जाणे थोडे अडचणीचे व आडवळणाचे होत आहे., या ठिकाणी गर्दीही जास्त असते, त्यामुळे बेंबळे येथे तातडीने कोरोना मोफत लसीकरण केंद्र सुरू करून सर्व प्रकारच्या नागरिकांची शासनामार्फत सोय करण्यात यावी असे सरपंच विजय पवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
चौकट...
बेंबळे सरपंचाकडून निवेदन स्वीकारल्यानंतर परिते आरोग्य केंद्र अधिकारी डॉक्टर यश सातपुते म्हणाले की बेंबळे येथील जास्तीत जास्त नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये किंवा आरोग्य उपकेंद्रांमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे व यास आता तुम्ही सुरुवात करावी. आम्ही वरिष्ठांना सर्व बाबीची वस्तुस्थिती कळवून लवकरात लवकर बेंबळे येथे मोफत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निश्चित प्रयत्न करतो .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा