Breaking

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

AJ 24 Taas News च्या दणक्याने....72 तासापूर्वीच पोलीसांनी घेतली दखल... शासकीय वैद्यकीय क्षेत्र निद्राधीन...* *कुर्डुवाडीत "कोरोनो स्प्रेडच्या" पार्श्वभूमीवर पोलिस पथकांच्या धाडीने खाजगी लॅबवाल्यांचे धाबे दणाणले...* *लॅबवाल्यांची पळता भुई थोडी... किट्सची पळवापळवी?*



AJ 24 Taas News बातमीच्या  दणक्याने....72 तासापूर्वीच पोलीसांनी घेतली दखल... शासकीय वैद्यकीय क्षेत्र निद्राधीन...*

  *कुर्डुवाडीत "कोरोनो स्प्रेडच्या" पार्श्वभूमीवर पोलिस पथकांच्या धाडीने खाजगी लॅबवाल्यांचे धाबे दणाणले...*
     *लॅबवाल्यांची पळता भुई थोडी... किट्सची पळवापळवी?*
   *पोलिसांच्या अतिदक्षतेबाबत नागरिकांतून कौतुक...*


*✒️ AJ 24 Taas News कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे पत्रकार यांजकडून...*


     *कुर्डुवाडी शहरांत गेल्या अनेक महिन्यांपासून "कोरोनो" टेस्टच्या नावाखाली चाललेल्या गैरकारभाराबाबत  आज कुर्डुवाडीत तीन लॅबवर पोलीसांच्या विशेष पथकांनी अचानकच धाडी टाकल्याने वैद्यकीय क्षेत्रच हादरुन गेले असून लॅबवाल्यांचीही पळता भुई थोडी झाल्याचे दिसून आले.*
        *पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांच्या आदेशानुसार पोलिस उपअधीक्षक विशाल हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक रविंद्र डोंगरे, सहायक पोलिस निरीक्षकद्वय चिमणाजी केंद्रे, सहकारी दत्ता सोमवड,ओम दासरे,टेंभुर्णीचे पोलिस,डमी पेशंट आदींच्या तीन पथकांच्या अचानकच धाडसत्रने एकच खळबळ उडवून दिली.*
      *माढा रोडवरील समर्थ लॅब, मध्यवर्ती ठिकाणी शुभम लॅब व टेंभुर्णी रोडवरील मुस्कान लॅब या तीन लॅबवर पोलीसांच्या धाडी टाकल्या.या धाडीमध्ये रॅपिड अॅन्टीजन टेस्ट व आर.टीपी.सी.आर.संबंधित गेल्या महिनाभराचे रेकाॅर्ड, रुग्णांची माहिती,त्यांना असणारे परवाने,अधिकृत लॅबबाबतची कागदपत्रे,थायरो केअर व कृष्णा पुणे लॅबच्या संदर्भातील कागदपत्रे आदी सर्व कागदपत्रांची जागेवर तपासणी करुन ती कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.*
        *या सर्व कागदपत्रांच्या आधारे कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करून सोलापूर सिव्हील सर्जनना अहवाल सादर केला जाणार आहे.*
   *त्यांच्या अहवालावरील उत्तरानंतर कायदेशीर पडताळणी करून पूढील कारवाई पोलीस कोठडी खात्याकडून केली जाईल असे पोलिस उपअधीक्षक विशाल हिरे साहेब यांनी सांगितले.*
      *पोलिस खात्याच्या अतिदक्ष कारवाईमुळे नागरिकांत समाधान व कौतुक व्यक्त केले जात आहे.*
     *तीनच दिवसांपूर्वी "विशेष बुलेटिन" द्वारे आवाज उठवून गैरप्रकार चव्हाट्यावर आणला होता.*
      *दरम्यान किट्सच्या पळवापळवी बाबत वैद्यकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू असून काही लॅबवाल्यांनी पलायन का केले याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा