कुर्डुवाडी शहरांत ग्रामीण रुग्णालयात तातडीने कोविड सेंटर सुरू करण्यासाठी रिपाइंचे जिल्हाकार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांचे आ.संजयमामांना साकडे*
............................................. *आमदार संजय मामांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वाशी तातडीने चर्चा*
*✒️ AJ 24 Taas News कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे पत्रकार
कुर्डुवाडी शहरांसह माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनो रुग्णांची संख्या वाढत असल्याने कुर्डुवाडी शहरात ग्रामीण रुग्णालयात तातडीने कोविड सेंटर उभारण्याची गरज असलेने शहर व तालुका रिपाइं आठवले गटाच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले.याप्रसंगी कुर्डुवाडीचे नगराध्यक्ष समीर मुलाणीही उपस्थित होते.*
*गेल्या पंधरा दिवसांपासून कुर्डुवाडी शहराबरोबरच माढा तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढीने हैदोस घातला आहे.*
*शासकीय यंत्रणावरील ताण वाढला असून त्या लसीकरणातही गुंतल्या आहेत.अशामध्ये रुग्णांची मोठी हेळसांड होत असून उपचारा अभावी रुग्णांच्या मृत्यूमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.*
*सध्याची शासकीय सुविधा तोकडी आहे.व खाजगी रुग्णालयात संपूर्ण सोयी उपलब्ध नसल्याने रुग्ण बार्शी व सोलापूरला जाईपर्यंत दगावतात.*
*कुर्डुवाडी शहरांत ग्रामीण रुग्णालयात एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची तसेच नजीकच बचत गटाचीही इमारती आहेत.येथे युध्दपातळीवर प्रयत्न करुन त्वरेने कोविड सेंटर उभे रहाणे गरजेचे आहे.*
*याबाबत रिपाईचे चंद्रकांत वाघमारे, नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनीही सविस्तर चर्चा केली.*
*गेल्या वर्षभरात नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे ते खाजगी रुग्णालयाचा आर्थिक भार सहन करु शकत नाहीत.त्यातच त्यांची हेळसांड व मृत्यूचे प्रमाणही वाढली आहे.*
*आमदार संजय मामा शिंदे यांनी तातडीने जिल्हाधिकारी,प्रांत यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्याधिका-याना योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याचें सुचविले. आवाहन केले आहे.*
*नागरिकांनीही कुर्डुवाडीत कोविड सेंटर उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.रिपाईच्या मागणीस सर्वंजण एनकेन प्रकारे हातभार लावू व तातडीने कोविड सेंटर उभे रहाण्यासाठी पक्षविरहीत पुढाकार घेऊन त्वरेने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे नागरिकांचेही मत आहे.*
*माढा तालुक्यांचे आमदार बबनदादां शिंदे व त्यांचे पुत्र रणजित भैय्या शिंदे यांनी माढा ग्रामीण रुग्णालयात पन्नास बेडचे कोविड सेंटर येत्या आठच दिवसात उभे करण्याचे घोषित करुन चंग बांधला आहे.*
*याच धर्तीवर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात तातडीने कोविड सेंटर उभे रहावे अशी सर्वत्रच मागणी आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा