*माझे कुटुंब माझी जबाबदारी, योजना यशस्वी करावी, नगराध्यक्ष श्री सचिन भैय्या रोचकरी यांचे आवाहन*
मा.ना. पालकमंत्री महोदय व मा. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतील "माझे कुटुंब माझी जबाबदारी" अंतर्गत कोरोना कोविड 19 तुळजापूर शहरातील प्रत्येक कुटुंबातील आजारी,वृद्ध लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने दहा पथक आज पासून कार्यरत झालेली असून ते प्रत्येक गल्लीत प्रत्येक भागात प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना कुठल्या प्रकारचा आजार अथवा काही वैद्यकीय उपचाराची गरज आहे का याची कसुन चौकशी करणार असून या मध्ये ते गरज पडल्यास संबंधितांना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार असून या कामी तुळजापूर नगर परिषदेत हद्दीतील सर्व नागरिकांनी सहकार्य करून सदर "माझे कुटुंब माझे कुटुंब माझी जबाबदारी" योजना यशस्वी करावी असे आवाहन नगराध्यक्ष श्री.सचिन रोचकरी यांनी केले आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा