Breaking

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

पिंपळनेरचे दैनिक पुढारी चे ज्येष्ठ पत्रकार सय्यदअली जकाते यांचे निधन..



पिंपळनेरचे दैनिक पुढारी चे ज्येष्ठ पत्रकार सय्यदअली जकाते यांचे निधन...

बेंबळे । प्रतिनिधी।  AJ 24 Taas News                    

                             पिंपळनेर येथील श्री गणेश विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक व दैनिक पुढारी चे पिंपळनेर येथील पत्रकार जनाब सय्यदअली जकाते यांचे रविवार दिनांक 11 रोजी सायंकाळी सात वाजता कुर्डुवाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले, ते 68 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.पैगंबरवासी जकाते सर हे धर्माने मुस्लिम असले तरी रामायण, महाभारत, पोथी- पुराण, पिंपळनेर मधील कुठलाही धार्मिक उत्सव, कुठलाही सामाजिक वा राजकीय कार्यक्रम असेल तर त्यामध्ये ते हिरीरीने भाग घेत असत व अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन, प्रवचन, संभाषण किंवा सुत्र संचालन करत असत. एक प्रगल्भ विचारवंत म्हणून व प्रसिद्ध वक्ते म्हणून या संपूर्ण पंचक्रोशीत ते प्रसिद्ध होते. दैनिक सोलापूर पुढारीचे ते पिंपळनेर मधील प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष काम करत होते. टेंभुर्णी शहर- ग्रामीण पत्रकार संघटनेचे ते एक प्रभावी जेष्ठ मार्गदर्शक म्हणून सर्वांना आदरणीय होते. जनाब सय्यद अली जकाते यांच्या निधनाने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेले आहे. पिंपळनेर येथे त्यांच्या दफनविधी प्रसंगी राजकीय, सामाजिक , शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मोजकेच मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
**टेंभुर्णी प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार जकात यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली

*त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळताच टेंभुर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष नाना पाटील, उपाध्यक्ष सतीश काळे, व सचिव सचिन होदाडे यांनी तातडीने टेंभुर्णी प्रेस क्लब ची मिटिंग घेऊन मिटिंग मध्ये ज्येष्ठ पत्रकार सय्यद आली जकाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी टेंभुर्णी परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा