Breaking

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

हातगाडयावरील व्यवसायिकांविरोधातील कारवाई थांबविन्यासाठीकाॅग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन**



*हातगाडयावरील व्यवसायिकांविरोधातील  कारवाई  थांबविन्यासाठीकाॅग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
*करमाळा तालुका  प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
          करमाळा शहरातील गोरगरीब हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात  करमाळा नगरपरिषद कारवाई करत आहे ती कार्यवाही थांबविण्यात यावी याबाबत तहसीलदार समीर माने यांना सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी निवेदन दिले.
      यावेळी फारूक जमादार, दादासाहेब इंदलकर असलम नालबंद उपस्थित होते.
            यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की करमाळा शहरातील गोरगरीब हातगाडेवाले शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्स ठेवून, मास्क लावुन पार्सल विक्री करत आहे .परंतु आज दुपारी करमाळा नगरपालिकेने हातगाडयावर कारवाई केली आहे. विशेषतः दररोज हातगाडयावाल्याकडून फी वसुल करत आहे. जर हातगाडे बंद झाल्यास त्यांच्या वर उपासमारीची वेळ येणार आहे. त्या मुळे रोजीरोटी चा प्रश्न निर्माण होणार आहे. त्या मुळे शासनाच्या नियमांचे शंभर टक्के पालन करून सोशल डिस्टन्स ठेवून हातगाडे चालू आहेत. त्या मुळे  हातगाडयावरील कारवाई थांबविण्यात यावी अशी मागणी सुनील  सावंत यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा