Breaking

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

श्रीगोंदा येथे श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये कोविड सेंटरचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाटन............... कोविड सेंटर चालू करण्याची भुमिका प्रशंसनीय-महसूलमंत्री बाळासाहेब थोरात



श्रीगोंदा येथे श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये कोविड सेंटरचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उदघाटन 
कोविड सेंटर चालू करण्याची भुमिका प्रशंसनीय-महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 

श्रीगोंदा प्रतिनिधी : राजेश बाराते
       श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात आले.महसुलमंत्री मा.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हे कोविड सेंटर श्रीगोंदा जनतेसाठी सुपूर्द करण्यात आले.कोविड सेंटरमध्ये ३०० बेडची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. 
         या प्रसंगी मा.बाळासाहेब थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कोरोना हे जागतिक संकट आहे.जनतेचे प्राण वाचवण्यासाठी संचारबंदी हाच एकमेव उपाय आहे.याचे कोणीही राजकारण न करता साहाय्याची भूमिका घ्यावी.राजकारणासाठी बरेच दिवस आहे.तसेच राजेंद्र नागवडेंची श्रीगोंद्यामध्ये कोविड सेंटर चालू करण्याची भुमिका प्रशंसनीय आहे.कोरोना रुग्णांनी होमक्वारंटाइन होण्याऐवजी हेल्थ केअर सेंटर मध्ये उपचार करावेत.ऑक्सिजन,इतर औषधे व लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहेत.असे प्रतिपादन केले.
      स.म.शि.ना.नागवडे स.सा.कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी बोलताना कोरोना विरुध्दची लढाई ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.शासनाच्या मदतीच्या भावनेने
ही जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ज्ञानदीप  व छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यालयात कोविड हेल्थ सेंटरसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची तयारी आहे.असे मत व्यक्त केले.कै.शिवाजी बापूंच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा या संकट काळी सक्षमपणे चालवत आहेत.या कोरोना संकटकाळी समस्त नागवडे कुटुंबीय अग्रक्रमाने समाजउपयोगी कार्य करत आहेत.गतवर्षीही कोविड सेंटर चालू करत त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला होता.समाजाप्रति असणारी आस्थेची भावना फक्त राजकारणापुरती न ठेवता.आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो.या संकटकाळी श्रीगोंदा जनतेच प्राण वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न संजीवनी देणारा ठरणार आहेत.
       नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात प्रमुख नेतेमंडळीनी करोना सेंटर निर्माण केली आहेत.पारनेर मध्ये निलेश लंके,कर्जत जामखेड रोहित पवार यांनी सेंटर निर्माण केली आहेत.श्रीगोंदयामध्ये प्रथम राजेंद्र नागवडे यांनी करोना सेंटर निर्माण करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे.कोरोनाची दाहकता लक्षात घेता सोयीसुविधा अपुऱ्या पडत आहेत.श्रीगोंदा तालुक्यात कोरोना आलेख ६०० पार झाला आहे.त्यामुळे सुविधा अभावी रुग्ण उपचारासाठी बाहेर जात आहेत.त्यांची परवड थांबत या करोना सेंटरचा चांगला उपयोग होईल.
        या प्रसंगी आरोग्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली व रुग्णांची संख्या आणि उपचार बाबत अडचणी ज्ञात केल्या.आमदार बबनराव पाचपुते,मा.आमदार सुधीरभाऊ तांबे,मा.श्री.घनश्यामआण्णा शेलार,मा.श्री.दिपक भोसले यांनी मार्गदर्शन केले. 
        या उदघाटन कार्यक्रमासाठी सौ.अनुराधाताई नागवडे जि.प.सदस्या तथा जिल्हा बॅक संचालीका,मा.आ.राहुल जगताप,श्री.बाबासाहेब भोस,श्री.बाळासाहेब सांळुके,श्री.ज्ञानदेव वाफारे,श्री.दिपक नागवडे,सौ.शुभांगीताई पोटे,श्री.अतुल लोखंडे,श्री.स्मितल वाबळे,श्री.मनोहर पोटे,प्रांताधिकारी स्वाती दाभाडे व तहसीलदार प्रदिप पवार हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा