Breaking

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

करमाळ्यात रेडमिसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याना सेवामुक्त करुन गुन्हा दाखल करा:-राष्ट्रवादी काँग्रेस*



*करमाळ्यात रेडमिसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याना सेवामुक्त करुन गुन्हा दाखल करा:-राष्ट्रवादी काँग्रेस*

करमाळा:-कोरोना सारख्या जगातील महामारीत रेडमिसिविर सारख्या महत्वाच्या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्याना सेवामुक्त करुन संबंधीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार करमाळा यांच्याकडे केली आहे.याबाबत अधिक बोलताना राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे म्हणाले की, एका वेब पोर्टलवर *करमाळ्यात रेमडीसिव्हिर इंजेक्शनाचा काळाबाजार, पंचायत समिती अधिकारी व डॉक्टरांचा समावेश* या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द झाली होती. 
     करमाळ्यातील एक नामांकित डॉक्टर(पवार ) व पंचायत समिती कर्मचारी(जाधव) यांचे संभाषण व्हायरल झाले आहे.यानुसार पंचायत समिती कर्मचारी तथा कोविड सेंटर तपासणी कर्मचारी यांच्यात रेमडीसीविर  इंजेक्शन बेकायदेशीर रित्या दिले घेतल्याचे लक्षात येत आहे.तसेच पंचायत समिती कर्मचारी डॉक्टर ला तुमच्याविरुद्ध आमच्याकडे जास्त बिल आकारल्यासंदर्भात तक्रारी येत असून तुम्ही कोविड सेंटरच्या माध्यमातून खोऱ्याने पैसे ओढत असल्याचे संभाषण आहे.कोरोनाच्या या गंभीर स्थितीत रेमडीसीविर इंजेक्शनचा असा काळाबाजार करणं बेकायदेशीर आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे आणि कोविड सेंटर चालवणारे व तपासणी करणारे हे यामध्ये आकंठ बुडाले आहेत.तरी हा प्रकार बेकायदेशीर व गंभीर आहे.आशा प्रकारामुळे संबधीत लोकांनी असा किती गैरव्यवहार केला हे जनतेसमोर आले पाहिजे.यांबधी प्रशासनाने लक्ष घालून संबंधित पंचायत समिती कर्मचारी व कोविड सेंटर चालवणारे डॉक्टर यांच्या विरोधात जागतिक रोग साथीच्या महामारीत औषधाचा काळाबाजार केल्याप्ररकणी,कोविड सेंटर मध्ये अवाजवी जास्तीची बिले आकरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा.तसेच संबधित हॉस्पिटलने मागील 1 वर्षात उपचार घेतलेल्या सर्व रुग्णाची चौकशी व्हावी.संबधित पंचायत समिती कर्मचारी यास सेवेतून बडतर्फ करावे.अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य महेश काळे पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस महेश मोरे,राष्ट्रवादी पडावी संघाचे तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर,राष्ट्रवादी किसान सेलचे ता.कार्याध्यक्ष सचिन नलवडे,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,समाजसेवक सचिन गायलावड,वंचीत आघाडीचे शहराध्यक्ष विशाल लोंढे यांनी केली आहे.तसेच निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार केली आहे अशी माहिती नितीनभाऊ झिंजाडे यांनी शेवटी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा