गुळपोळी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
गुळपोळीत महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून साजरी करण्यात आली
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लक्ष्मण काळे पोस्टमन तर अध्यक्ष गणेश लंगोटे हे होते. प्रमुख उपस्थिती सागर चौधरी सुमित माळी आदेश भालशंकर होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लक्ष्मण काळे गणेश लंगोटे
यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला .यावेळी विविध मान्यवरांचे गुलाब देऊन सत्कार करण्यात आला. विविध मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केली. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी गणेश लंगोटे गुलाब शेख किरण खुरंगळे सुमित माळी समर्थ ढावारे सचिन शिंदे सागर चौधरी सचिन राऊत नागनाथ फोके अमित काळे इतर मान्यवर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना भैरवनाथ चौधरी तर सूत्रसंचालन किरण खुरंगळे कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन भैरवनाथ चौधरी यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा