Breaking

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

पुरवठा अधिकारी व गेवराई तहसीलदार यांच्यावर आठ दिवसाच्या आत गुन्हा दाखल करा अन्यथा तीव्र आंदोलन करू*- अविनाश तांदळे. =================================


*पुरवठा अधिकारी व गेवराई तहसीलदार यांच्यावर आठ दिवसाच्या आत गुन्हा दाखल करा अन्यथा  तीव्र आंदोलन करू*- अविनाश तांदळे
==================================================================
गेवराई- नवनाथ आडे

पोलीस अधीक्षक कार्यालय , आणि  जिल्हा अधिकारी कार्यलय बीड येथे निवेदन
_____________________________
सिरसदेवी (वार्ताहार):- दि.६ पत्रकार शाम अडागळे यांना गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांनी शिवीगाळ करून खुर्ची वरून उठुन धक्का दिल्या प्रकरणी त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यसाठी पोलिस प्रशासन टाळा टाळ करत असल्याने आज दि ०६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड व जिल्हाधिकारी कार्यालयात मानकरी महाराष्ट्राचे संपादक अविनाश तांदळे यांनी निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की दि २६/०३/२०२१ रोजी पत्रकार शाम अडागळे यांना तहसील कार्यालयात माहिती अधिकाराच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे गेवराई तहसील कार्यालय येथून पत्र आले होते .

त्या पत्राच्या आधारे शाम अडागळे हे सुनावणी साठी  दि २६ रोजी वेळ ४ वाजता उपस्थित राहिले पण तहसीलदार यांनी दिलेल्या पत्रात नमुद केल्या प्रमाणे माहिती दिली नाही. 

तहसीलदार सचिन खाडे यांनी सुनावणी केली की संबंधित रेशन दुकानदाराकडून माहिती घ्या त्यावेळेस पत्रकार शाम अडागळे यांनी काही प्रश्न केले असता तहसीलदार यांना पारा चढला आणि खुर्ची वरून उठून शिविगाळ केली व धक्का दिला व तिथे उपस्थित पुरवठा अधिकारी रामदासी यांनी पत्रकार असेच माजलेत अशी भाषा केली .
 ही सर्व घटना तहसीलदार यांच्या कॅबिन मध्ये घडली आहे व सिसिटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाली आहे.

या प्रकरणाची तक्रार शाम अडागळे यांनी दि २६ रोजी गेवराई पोलीस स्टेशनला व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गेवराई येते दिली आहे.

पण त्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळा टाळ केली.पहिले तीन दिवस सिसिटीव्ही फुटेज च्या नावाखाली गुन्हा दाखल केला नाही. नंतर तपासी अधिकारी यांना तहसीलदार खाडे यांनी कॅबिन मध्ये सिसिटीव्ही उपलब्ध नसल्याचे पत्र दिले आहे.
 
सुनावणी दरम्यान उपस्थित असणारे दोन साक्षीदार राहुल चाळक व इतर एकजण यांचा तपासी अधिकारी यांच्या समोर तोंडी व लेखी जवाब घेतला तरी गुन्हा दाखल होत नाही.
 
जर आठ दिवसाच्या आत पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर सर्व पत्रकार व संघटना च्या माध्यमाने तीव्र आंदोलन करू असे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालय बीड व जिल्हा अधिकारी कार्यालयात मानकरी महाराष्ट्राचे संपादक अविनाश तांदळे यांनी दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा