*कुर्डुवाडीतील लॅबवाल्यांच्या धाडसत्रानंतर आठवडाभरात झटक्यात चाळीस टक्के रुग्णसंख्या कमी...*
*सुपर स्प्रेडर लॅबवाल्याविरुध्द कारवाई अटळ? "रॅकेट"चा पोलिस खाते पर्दाफाश करणार?*
*"पोलीसांचा व विशेष बुलेटिनचा" कयास खरा ठरल्याने नागरिकांकडून धन्यवाद...*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार) यांजकडून...*
*कुर्डुवाडी शहरांत कोरोनोने आठ दिवसांपूर्वी थैमान घातले होते.प्रशासकीय पातळीवर त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नव्हती.*
*त्यातच शहर परिसरातील मृत्यूने थैमान घातल्याने नागरिकांत एकच घबराट निर्माण झाली होती.*
*याबाबत "विशेष बुलेटिन" च्या माध्यमांतून सुपर स्प्रेडरच्या पार्श्र्वभूमीवर खोलवर माहिती व चौकशी केली असता कुर्डुवाडीतील रुग्ण वाढीला लॅबवाल्यांचा गैर,बेकायदेशीर, कारभार तर जबाबदार असून त्यांनी जो प्रचंड धुमाकूळ घालून लूट लावली होती त्याविरुद्ध १७ एप्रिल रोजी आवाज उठविण्यात आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.*
*प्रशासकीय पातळीवर गंभीर परिस्थितीची कुणीही दखल घेतली नाही.*
*मात्र "विशेष बुलेटिन"ची पोलिस खात्याकडून चाणाक्षपणे दखल घेतली.पोलीस अधिक्षिका तेजस्विनी सातपुते यांच्या आदेशानुसार विभागाचे उपअधीक्षक विशाल हिरे साहेब यांनी या गंभीर प्रकाराची बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून व माहिती घेऊन अचानक धाडसत्राचे नियोजन केले होते.*
*मंगळवारी २० एप्रिल रोजी उपअधीक्षक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तीन पथकांनी अचानकच कुर्डुवाडीतील समर्थ लॅब, शुभम लॅब, मुस्कान लॅब येथे धाडी टाकून समर्थ लॅबमध्ये विनापरवाना अॅन्टीजन टेस्ट करण्यात येत असल्याचे आढळले.तर उर्वरित दोन लॅबवाले सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून गोरख धंदा करित असल्याचे समोर आले.या लॅबवाल्यांना अनेक डाॅक्टरांचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार असल्याचे दिसून आले.*
*पोलिसांच्या धाडसत्रांनंतर गेल्या आठवड्याभराचा व तत्पूर्वीच्या "सुपर स्प्रेडर"आठवड्याचा तुलनात्मक अभ्यास करता पोलिस खात्याचाही विशाल चाणाक्ष धाडसत्र व कयास खरा ठरल्याचे प्रत्यक्षात दिसून येते.*
*मंगळवारच्या धाडसत्राच्या अगोदरच्या "सुपर स्प्रेडर"आठवड्यात १८५ रुग्ण कोरोनो पाॅझीटीव्ह आढळून आले होते.याच आठवड्यात वरील तीनही लॅबवाल्यांनी जास्तीत जास्त तपासण्या केल्या होत्या.*
*मंगळवारच्या पोलिसांच्या धाडसत्रानंतर गेल्या आठवड्यात फक्त ८५ रुग्ण आढळून आले आहेत.तुलनात्मक आकडेवारी पहाता आठवड्यातच ४० टक्के रुग्ण संख्या कमी झाली आहे.*
*याचा सरळ सरळ असा अर्थ निघतो की, लॅबवाल्यांच्या गैरकारभारामुळे व बेपर्वाईमुळे सुपर स्प्रेडर काळात रुग्ण संख्या वाढलेली दिसून येते.*
*दरम्यान आज ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी पहाटे पासूनच उडालेल्या झुंबडीबाबत नागरिकांना प्रचंड त्रास झाला असून गेल्या आठवडाभरापासून नियोजनातही अनेक त्रुटी आढळल्या असून त्या तातडीने दुरुस्त करून योग्य ते नियोजन करण्यात यावे अशी सर्व कुर्डुवाडी शहरवासीयांची मागणी आहे.*
*कमी होत चाललेली रुग्ण संख्या गलथाण कारभारामुळे वाढू नये ही रास्त अपेक्षा अनेक वयोवृद्ध नागरिकांनी बुलेटिन प्रतीनिधीकडे व्यक्त केली आहे.*
*याबाबत ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधला असता वैद्यकीय अधिक्षिका डॉ.सुनंदा रणदिवे यांनी याची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सांगितले आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा