*राजपिंप्रीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
गेवराई तालुक्यातील राजपिंप्री येथील एका 21 वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतला आनंता तुकाराम माने या तरुणाचा मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल उबाळे व विठ्ठल राठोड यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. अनंता माने याने आत्महत्या कशामुळे केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
या तरुणाने रात्री आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेची राज पिंपरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा