Breaking

रविवार, ४ एप्रिल, २०२१

*बीड जिल्ह्याचा आज मध्यराञी लाॅकडाऊन उठणार?

बीड जिल्ह्याचा आज मध्यराञी लाॅकडाऊन उठणार?*

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे

बीड जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसचे लाॅकडाऊन जिल्ह्यात लागु केले होते. त्याची मुदत आज मध्यराञी संपणार आहे. 
पण अजुनही जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नाजूकच आहे. यामुळे जिल्हाधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे जिल्ह्यात विविध कडक निर्बंध लागु केले होते. 
परंतु त्यांने काहीच फरक पडत नसल्यामुळे २६ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात लाॅकडाऊनची घोषणा केली होती. 
आज मध्यराञी या लाॅकडाऊनची मुदत संपत आहे. परंतु अजुनही जिल्ह्यातील परिस्थीती नाजुकच आहे. दिवसाकाठी ३०० ते ४०० नव्या रुग्णांची भर जिल्ह्यात पडत आहे. 
यामुळे जिल्हाधिकारी परत लाॅकडाऊन लावतात का लाॅकडाऊन उघडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा