Breaking

गुरुवार, २० मे, २०२१

माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर व माळशिरस तालुक्यासाठी 1 कोटी 47 लाखांचा निधी - रणजितसिंह शिंदेजिल्हा नियोजन समितीकडून नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी



माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर व माळशिरस तालुक्यासाठी 1 कोटी 47 लाखांचा निधी - रणजितसिंह शिंदे

जिल्हा नियोजन समितीकडून नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम व दुरुस्तीसाठी 

माढा / प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून सन 2020 -21 करिता माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध शाळांमध्ये भौतिक सुविधा अद्ययावत करणे आणि नादुरुस्त व पडझड झालेल्या शाळा खोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या सहकार्याने व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातून 1 कोटी 47 लाख 35 हजार रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील 9 ठिकाणी नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी 69 लाख 63 हजार निधी मंजूर झाला असून त्यामध्ये तुंगत 2 खोल्या 15 लाख 8 हजार, सांगवी 2 खोल्या 15 लाख 8 हजार, करकंब मुलींची शाळा क्रमांक-एक करिता 1 खोली 8 लाख 13 हजार,जळोली-धनगरवस्ती एक खोली 8 लाख 13 हजार,बार्डी 2 खोल्या 15 लाख 8 हजार,वाफळकर वस्ती-बार्डी 1 खोली 8 लाख 13 हजार रुपये तर पंढरपूर तालुक्यातील नादुरुस्त व खराब झालेल्या शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी 23 लाख 95 हजार निधी मंजूर झाला असून त्यामध्ये पांढरेवाडी 2 लाख, मेंढापूर 2 लाख,चिंचणी-पुनर्वसन 2 लाख, पटवर्धन कुरोली-चिंचकर वस्ती 3 लाख,करकंब-खारे वस्ती 2 लाख 99 हजार,करकंब-मुले शाळा क्रमांक- एक करिता 2 लाख 99 हजार, करकंब मुले शाळा क्रमांक-दोन करिता 2 लाख 99 हजार, बार्डी-कवडे वस्ती 2 लाख 99 हजार, बार्डी-वाफळकर वस्ती 2 लाख 99 हजार यांचा समावेश आहे.

माळशिरस तालुक्यात विविध ठिकाणी नवीन शाळा खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी 30 लाख 16 हजार निधी मंजूर झाला असून त्यामध्ये नेवरे 2 खोल्या 15 लाख 8 हजार,जांभूड 2 खोल्या 15 लाख 8 हजार रुपये निधी तर माळशिरस तालुक्यातील विविध ठिकाणच्या शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी 23 लाख 61 हजार निधी मंजूर झाला असून त्यामध्ये नेवरे 2 लाख 95 हजार, बोरगाव-पाटील वस्ती 2 लाख 90 हजार, बोरगाव सेक्शन डी-19 करिता 2 लाख 90 हजार, बोरगाव सेक्शन-10 करिता 2 लाख 90 हजार, वाघोली-शेंडगे वस्ती 2 लाख 99 हजार,महाळुंग-भगत वस्ती 2 लाख 99 हजार,महाळुंग- मुंडफणे वस्ती 2 लाख 99 हजार, महाळुंग-रेडे वस्ती 2 लाख 99 हजार यांचा समावेश आहे.अनेक दिवसांपासूनची मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या मागणीची या निमित्ताने पूर्तता होणार असून लवकरच या शाळा खोल्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असल्याचे रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा