*कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने टेंभुर्णीतील बांधकाम ठेकेदाराचा मृत्यू तर वडील गंभीर जखमी*
*टेंभुर्णी प्रतिनिधी/ अमोल भोसले यास कडून
टेंभुर्णी, : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वेणेगांव हद्दीत कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने
टेंभुर्णीतील शुक्रवारपेठेतील बांधकाम ठेकेदार बापूसाहेब दादासाहेब पिंगळे ( वय- 34) यांचा मृत्यू झाला तर त्याचे वडील दादासाहेब पिंगळे ( वय-60) हे गंभीर जखमी झाले. बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास झाला रात्री उशीरापर्यंत या अपघाताची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
टेंभुर्णी येथील शुक्रवार पेठेत खिंडीजवळ राहणारे बापूसाहेब पिंगळे व त्यांचे वडील दादासाहेब पिंगळे हे मोटारसायकल ( एम एच-45 / डब्ल्यू 3466) हे वेणेगांवकडे जात असताना कारने (एम एच 12 /एम आर 6765) जोरदार धडक दिली या अपघातामध्ये बापूसाहेब पिंगळे व त्यांचे वडील दोघे ही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकलूज येथे उपचारासाठी हलविले परंतु बापूसाहेब पिंगळे यांचा मृत्यू झाला. दादासाहेब पिंगळे यांच्यावर अकलूज येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा