AJ 24 Taas News Maharashtra या बातमीची दखल महाराष्ट्र शासनाने काढला आदेश
*कुर्डुवाडीसह राज्यभर अनधिकृत व बेकायदेशीर लॅबवाल्यांवर कारवाई करण्याच्या आदेशाने लॅबवाल्यांची पळताभुई थोडी...*
*बेकायदेशीर लॅबवाल्यांना पाठीशी घालणाऱ्या सर्व यंत्रणा पडल्या उघड्यावर...*
*"कुर्डुवाडी विशेष बुलेटिन" आवाज राज्यभर गाजला... नागरिकांत कौतुकाचा वर्षाव...*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*
*गेल्या महिनाभरापासून विशेष बुलेटिन मधून मधून बेकायदेशीर व अनधिकृत लॅबवाल्यांवर आवाज उठविण्यात आल्या नंतर सर्व यंत्रणा उघड्यावर पडल्या असून अखेर या लॅबोरेटरीवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य पॅरामेडिकल कौन्सिलने १०मे२१ रोजी पारीत केल्याने सर्वं लॅबवाल्यांचे भांडवल गुल झाले आहे.*
*याबाबत सविस्तर वृत्त असे की,अनधिकृत लॅबवाल्यांविरुध्द सर्व प्रथम १७एप्रिल रोजी आवाज उठविण्यात आल्या नंतर २० एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांच्या आदेशानुसार विभागाचे उपअधीक्षक विशाल हिरे यांच्या तीन पथकांच्या धाडसत्राने सर्वं प्रशासकीय यंत्रणा चक्रावल्या होत्या.त्या अद्याप सावरलेल्या नाहीत.*
*गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनोच्या पार्श्र्वभूमीवर राज्यभर लॅबवाल्यांनी फुटकळ दारुदुकानासारखी बेकायदेशीर लॅब थाटली होती.*
*याची मुख्य वैद्यकीय यंत्रणा महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल मुंबई यांनीच दखल घेऊन अनधिकृत कारवाई/१७५/२०२१या आदेशान्वये सर्व बेकायदेशीर व अनधिकृत लॅबवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश १० मे रोजी काढले असून राज्यातील जिल्हाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी यांना कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.*
*महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नियम २०११/VI/२०१६ अन्वये ३१(१) पॅरामेडिकल कौन्सिलच्या मान्यतेशिवाय कोणालाही लॅब उघडता येत नाही.*
*परंतू हाॅस्पिटल व डाॅक्टर्सना हाताशी धरून त्यांना बेकायदेशीर पाठीशी घालून अशी दुकाने थाटून संगनमताने हातमिळवणी करून हा गोरख धंदा सुरू होता.अधिकृत लॅबवाले सोडून बेकायदेशीर लॅबवाल्यांच्या तपासण्या केल्या जात होत्या.व सर्रास कमिशन मिळवून रुग्णांची लयलूट चालू होती.*
*पॅरामेडिकल कौन्सिल अधिकृत प्रमाणपत्र व नोंदणी क्रमांक देते.त्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला व लॅबधारकांना स्वतंत्रपणे अथवा एम.डी.पॅथाॅलाॅजीकल, कार्पोरेट लॅबमध्येही तंत्रज्ञ म्हणूनही काम करता करता येत नाही.*
*मान्यता प्राप्त मेडीकल लॅबोरेटरी वाल्यांकडे अधिकृत पदवी,अधिक पदविका व काउन्सिलची नोंदणी आदी बाबी धाब्यावर बसवून बेकायदेशीर दारुगुत्त्याप्रमाणे लॅबची दुकानें थाटून कार्पोरेट लॅबसह सर्वजण संगनमताने घरोघरी जाऊन रक्त व लघवीचे नमुने घेऊन रुग्णांची फसवणूक व आर्थिक लूट करीत आहेत.व कायद्याचं उल्लंघन करून रुग्णांच्या जिवाशी खेळ करित आहेत.*
*लॅबवाल्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे चुकिच्या उपचारांना बळी पडावे लागत आहे.*
*वरील नियमांचे उल्लंघन करणाऱे लॅबधारक कार्पोरेट लॅबसह सर्वंजण दखल पात्र गुन्हा करीत असून तो अजामीनपात्र आहे असे स्पष्टपणे दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.*
*सर्व अनधिकृत,बेकायदेशीर,अनोंदणीकृत लॅबवाल्यांविरुध्द कारवाई करुन त्या तातडीने बंद कराव्यात असे आदेश पारित केला आहे.*
*लॅबवाल्यासह संबंधित डॉक्टर्स व वैद्यकीय रॅकेटचा यात पर्दाफाश होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.*
*विशेष बुलेटिनच्या माध्यमातून आवाज उठविल्यानंतर जो राज्यभर कारवाईचा बडगा उचलला आहे त्याबद्दल AJ24TASSमहाराष्ट्रच्या विशेष बुलेटिन मधून जनजागृती केल्यानंतर व त्याची गांभीर्याने दखल घेऊन पॅरामेडिकल कौन्सिलच्या अध्यक्ष,प्रबंधक, सदस्य यांचेंवर राज्यभर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.👍*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा