नगराध्यक्ष पोटे यांनी आपल्या लग्नाच्या वाढिवसाचे औचित्य साधुन विविध कोवींड सेंटरला ३०० पाणी बॉक्सची केली मदत.....
श्रीगोंदा:-नितीन रोही
सविस्तर असे की कोविड सेंटर मधील पिण्याच्या पाण्याची अडचण पाहता माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मनोहर पोटे आणि त्यांच्या पत्नी विद्यमान नगराध्यक्षा सौ.शुभांगीताई पोटे या दांपत्याने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कोविड सेंटरला ३०हजार रुपयांचे ३०० पाणी बॉटल बॉक्स भेट देऊन रुग्ण सेवा करत वाढदिवस साजरा केला.
मंगळवार दिनांक १८ मे रोजी लग्नाचा वाढदिवस होता कोविड काळात वाढदिवस करण्याऐवजी पाण्याचे बॉक्स देण्याचा उभयतांनी निर्णय घेतला शहरातील श्री संत शेख महमंद महाराज (रत्नकमल मंगलकार्यालय)कोविड सेंटरला ७५बॉक्स,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह येथील शासकीय कोविड सेंटरला १०० बॉक्स,छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील कोविड सेंटरला ७५ बॉक्स तर ग्रामीण रूग्णालयात ५० बॉक्स भेट देण्यात आले.
यावेळी नगरसेवक सतीश मखरे,निसार बेपारी,समीर बोरा,वैद्यकीय अधिकारी डॉ.संघर्ष राजुळे,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेठ बोरा,गौरव बोरा,प्रा.बाळासाहेब बळे,आदी उपस्थित होते
वाढदिवसानिमित्त लोक मदत करतात पण लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी रुग्णाप्रति जपल्याने पोटे दाम्पत्यांचे शहरातील नागरिकांमधून आणि कोविड सेंटर मधील डॉक्टर,स्वयंसेवक, रुग्णांकडून कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा