Breaking

बुधवार, १९ मे, २०२१

मायणी वनक्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र घोषित*


*मायणी वनक्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र घोषित*

वडूज प्रतिनिधी / शरद कदम
         खटाव तालुक्यातील मायणी व येरळवाडी तलाव परिसरामध्ये पक्षांच्या विविध जाती वर्षभर पाहावयास मिळत असतात. त्यामुळे शासनामार्फत पक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी या भागास मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले होते. मात्र आता हे क्षेत्र संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासाठी मायणी, कानकात्रे, अंबवडे, नढवळ, येरळवाडी, बनपूरी गावचे ८६६ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे.
          सातारा वन विभागाच्या वडूज परिक्षेत्राच्या मायणी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये परिस्थितीकिय, प्राणीजातीय व वनस्पती विषयक महत्त्वाची असल्याने यामध्ये लेसर फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, ब्लॅक -टेल्ड, गॉडविट, जकाना, ओपन बिल्ड स्टोर्क आदि पक्षी व त्यातील प्राणीजाती व वनस्पती तसेच संरक्षित करण्याचा प्रयोजनार्थ शासनाचा स्थानिक समुदायिक विचारविनिमय केल्यानंतर हे क्षेत्र संवर्धन क्षेत्र म्हणून गरजेचे वाटले.
        उपसचिव गजेंद्र नरवणे यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली. मायणी पक्षी संवर्धन राखीव या नावाने ओळखले जाणार आहे. क्षेत्र आता संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामध्ये समूह क्रमांक १ मायणी तलाव व समूह क्रमांक २ येरळवाडी तलाव असे दोन समूह निश्चित करण्यात आले आहेत.
        यामध्ये मायणी तलाव व परिसर २१८ .२४ हेक्टर, कानकात्रे तलाव व परिसर सुमारे १४ .०९ चार हेक्टर, अंबवडे परिसर ७० .७२ हेक्टर, नढवळ परिसर १३२ .४० हेक्टर, येरळवाडी तलाव बुडीत क्षेत्र ३२६.२४ हेक्टर व बनपूरी तलाव बुडीत क्षेत्र १०४.२१ असे ८६६.७५ हेक्टर म्हणजे ८.३७ चौरस किलो मिटर क्षेत्र निश्चित केले आहे. 
         संघर्ष कमी होण्याबाबत मानव- वन्यजीव संघर्षाबाबत समन्वय साधण्यासाठी अंतर विभागीय राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यस्तरीय १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे मुख्य सचिव हे अध्यक्ष असणार आहेत. तर १७ सदस्य असणाऱ्या जिल्हास्तरीय समन्वय समितीचे कामकाज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चालणार आहे. यामुळे वन्यजीव वनक्षेत्राच्या विकासाला चालना मिळून मानव- वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे असे कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक डॉ.व्ही.क्लिमेंट बेन यांनी सूचीत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा