*धाकट्या भावाने थोरल्या भावाचा डोळ्यात चटणी टाकून सपासप कोयत्याने वार करून केला खून*
*फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावाच्या हद्दीतील दातेवस्ती येथे घडलेली घटना*
फलटण तालुका प्रतिनिधी/ शरीफ काजी यास कडून
फलटण प्रतिनिधी/ आपल्या आईला मारहाण करणाऱ्या मोठया भावाला त्याच्याच छोट्या भवानी खून केल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडली असूल या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की गणेश हनुमंत सावंत (वय 35) असे मयत तरुणाचे नाव असुन गुन्हयतील छोटा चुलत भाऊ अविनाश मल्हारी सावंत यास अटक केली असून तपास कामी विजय मल्हारी सावंत यास ताब्यात घेतले आहे.
दि.१९ मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील सस्तेवाडी गावच्या हद्दीत दातेवस्ती येथे गणेश हनुमंत सावंत याने अविनाश सावंत यास शेळीचे दुध काढण्यासाठी बोलवले असता तो आला नाही या कारणावरून मृत गणेश सावंत याचे त्याच्या आईशी भांडण झाले.
याचाच राग मनात धरून अविनाश मल्हारी सावंत याने गणेश सावंत यांच्या डोळ्यात तिखट चटणी टाकून त्याच्यावर धार धार सतुर व पाणी सोडण्याच्या लोखंडी पाण्याने वार करुन छोट्या भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली असूल
. पोलीस खबऱ्याकडून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती लागताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मल्हारी सावंत यास एक तासाच्या आत फलटण ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले असून पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक सोनवणे फलटण ग्रामीण पो.ठाणे हे करीत आहेत.
मा अजयकुमार बन्सल सो पोलीस अधीक्षक सातारा,श्री.धीरज पाटील साो अपर पोलीस अधीक्षक सातारा,श्री तानाजी बरडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली नितीन सावंत पोलीस निरीक्षक,अक्षय सोनावणे सहा.पोलीस निरीक्षक,उस्मान शेख पोलीस उपनिरीक्षक,शिवकुमार जाधव पोलीस उपनिरीक्षक,श्रीमती स्वाती धोंगडे महिला पोलीस उपनिरीक्षक,पो.हवा.दत्तात्रय कदम,पो.हवा.रामदास लिमन,पो.हवा.राजेंद्र फडतरे,पो.ना.राजेंद्र गायकवाड,पो.ना.राजकुमार देवकर,पो.ना.हरिभाऊ धराडे,संजय देशमुख,सचिन पाटोळे,निखील गायकवाड,गणेश अवघडे यांनी यातील आरोपी यांची गोपनीय रित्या माहिती घेवुन गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा