*सातेवाडी येथील मधुमाला मध्ये हुतात्मा स्मृती आयसोलोशन कक्षाचा शुभारंभ*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
सातेवाडी ता.खटाव येथील मधुमाला सांस्कृतिक केंद्रात सुरू करण्यात आलेल्या हुतात्मा स्मृती आयसोलोशन कक्षामुळे प्राथमिक अवस्थेतील रुग्णांना चांगला दिलासा मिळेल असे मत वडूज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले.
खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीपदादा मांडवे मित्रमंडळ, वडूज येथील जनता गॅरेज कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या कक्षाच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युनुस शेख, नगराध्यक्षा सुनिल गोडसे, सातेवाडीचे माजी सरपंच हणमंतर कोळेकर, ग्रा प सदस्य सचिन बोटे, डॉ.संतोष मोरे, आनंद पवार, महेश इगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.काळे म्हणाले की, काही रुग्णांच्या केवळ टेस्ट पॉझिटिव्ह येत असतात मात्र त्यांना आजारांची लक्षणे नसतात. अशा काही रुग्णांना स्वतःच्या घरी विलगीकरणाची सुविधा नसेल त्यांच्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. संदीप मांडवे यांनी सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी हे केंद्र सुरू केल्याचे सांगितले. या ठिकाणी युवकांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी नगराध्यक्ष गोडसे, धनंजय क्षीरसागर, धनाजी गोडसे यांचेही मनोगत झाले. दरम्यान माजी नगराध्यक्ष डॉ.महेश गुरव, माजी उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, इम्रान बागवान आदिनीही उद्धाटनानंतर भेट दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा