Breaking

रविवार, २ मे, २०२१

तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मायक्रो फायनान्सचे हप्ते भरण्यासाठी अधिक मुदत मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन*




*तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मायक्रो फायनान्सचे हप्ते भरण्यासाठी अधिक मुदत मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन*

काक्रंबा येथील महिलांनी काही मायक्रो फायनान्स व छोट्या बँक यांच्याकडून कर्ज घेतलेले असून, त्यांच्या हस्ते काही आठवड्याचे तर, काही पंधरा दिवसाचे, व काही महिन्यांचे आहेत,ते हप्ते भरण्यासाठी सर्व महिला कडे पैसे नाहीत, आणि काही काम धंदा नाही, ते काम धंदा नसल्या कारणाने,तसेच कोरोणा हा रोग आल्यामुळे कोणालाच काम धंदा व पैसा नाही म्हणून सर्व फायनान्स महिला काही काळ हप्ते भरू शकणार नाहीत, सर्व महिला सरकारला फक्त मुदत मागत आहे, की आमचे कर्ज माफ करा असे म्हणत नाही, तरी सरकारला निवेदन आहे की सरकारने सर्व फायनान्स ना आपल्या स्तरावरून व्यवहार जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत हप्ते मागण्यास फायनान्सचे प्रतिनिधी कर्जदाराकडे पाठवून हप्ते भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये, असे शासनाच्या स्तरावरून फायनान्स कंपनीने पत्राद्वारे आदेशित करण्यात यावे यासाठी आज दीं 30,एप्रिल रोजी  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनावर वंचितचे मिलिंद दादा रोकडे, जीवन कदम, सुरेश चौधरी,कमलेश कदम, ज्ञानेश्वर बनसोडे,आनंद कांबळे, बाजीराव साबळे, सुरेश मस्के, राकेश जेटीथोर, रवी साखरे, तसेच महिला आशा साळुंखे, राणी मस्के,सखुबाई डोलारे,  प्रेमा झोडगे, अर्चना गवळी पद्मिनी कांबळे, लक्ष्मी भिशे, कुसुम चंदनशिवे, उषाबाई कांबळे, लक्ष्मी गरड,सह  इतर महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा