शिक्षकांनी स्वतःचे आरोग्य जपत कोव्हिडची कामे वेळेत पूर्ण करावीत - गटशिक्षणाधिकारी मारुती फडके
उपळाई बुद्रुक केंद्रातील शिक्षकांची ऑनलाइईन मिटिंग संपन्न
माढा / प्रतिनिधी - जिल्हा प्रशासन व वरिष्ठांच्या आदेशानुसार सध्याच्या भयंकर संकटाच्या काळात कोव्हिडच्या संदर्भातील ट्रेसिंग व कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची कामे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी स्वतःचे आरोग्य जपत व योग्य ती काळजी घेत निर्धारित वेळेत पूर्ण करावीत असे आवाहन माढ्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी केले.
ते माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक केंद्रातील शिक्षकांच्या ऑनलाइन मिटिंगमध्ये बोलत होते.
प्रास्ताविकात केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी शैक्षणिक व कोव्हिड संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला.
पुढे बोलताना गटशिक्षणाधिकारी मारुती फडके म्हणाले की, मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे शाळा जरी प्रत्यक्षात बंद असल्या तरी ऑनलाईन अध्यापन,स्वाध्याय सोडवून घेणे,विविध शालेय व सहशालेय उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविणे आदी अनेक कामाबरोबरच कोव्हिडच्या संदर्भातील शासनाने व शिक्षण विभागाने सांगितलेली कामे शिक्षक अत्यंत जबाबदारीने पूर्ण करीत आहेत. यापुढेही प्राथमिक शिक्षकांनी ट्रेसिंग व माध्यमिक शिक्षकांनी लसीकरण रजिस्ट्रेशनचे काम करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी माढा बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी बंडु शिंदे म्हणाले की,उपळाई बुद्रुक केंद्रातील शिक्षकांचे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतरही कामकाज चांगले आहे.समाजसेवा करण्याची एक चांगली संधी म्हणून कोव्हिडच्या संदर्भातील सर्व कामे प्रामाणिकपणे करीत नवीन प्रवेश प्रक्रियेकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले.
यावेळी मुख्याध्यापक विजय काळे, औदुंबर गायकवाड विलास बोराडे, श्रीकांत काशीद,पांडुरंग शिंदे,राजेंद्र गुंड,शब्बीर तांबोळी,लहू लोंढे,ज्ञानेश्वर जगदाळे,संजय जाधव,शहाजी क्षीरसागर,सुहास चवरे,गणपत दाढे, अर्जुन गवळी,बंडू भोरे,राजाभाऊ कदम,सोमनाथ खरात,दिनेश गुंड, समाधान कोकाटे,मोहन चव्हाण, सचिन पवार,विठोबा गाडेकर,छाया राऊत,शुभांगी कदम,वंदना नकाते, शुभांगी गवळी,ज्योती नकाते यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.
- चौकट - येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने माढा तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेच्या व घराच्या परिसरात,शेताच्या बांधावर,पडित क्षेत्रात,तसेच ज्या ज्या ठिकाणी रिकामी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी मोठ्या संख्येने वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी निश्चित करावी.याकरिता विद्यार्थी,पालक व ग्रामस्थांमध्ये प्रबोधन व जनजागृती करावी आणि गावोगावच्या ग्रामपंचायतींचे सहकार्य घेण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी केले.
फोटो ओळी- गटशिक्षणाधिकारी मारुती फडके.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा