उमरा गावातील मुख्य रस्त्याची दुरावस्था...
ग्रामपंचायत व आजी-माजी सभापतींचे पण गावाकडे दुर्लक्ष...
संभाजी ब्रिगेडचा नाव न घेता विरोधकांना टोला
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा तालुक्यातील उमरा सर्कल म्हणून तालुक्यात आणि जिल्ह्यात परिचित आहे.सर्कल असणार गाव,बाजार पेठ वाडी तांड्या सह आजू-बाजूच्या १०-२० खेडेगावची दळणवळणासाठी नेहमी वर्दळ असणार उमरा सर्कल हे आत्ता नुसतं नावालाच राहील आहे.ना गावात रस्ते ना नाल्यां गावातील सांडपाणी सर्वत्र रस्त्याने बारा ही महिने वाहते.गावातील मुख्य रस्तातच नालीचे पाणी कोंडल्यामुळे सर्वत्र चिखल झाला आहे.यामुळे गावातील नागरिकांना आरोग्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.सध्या सर्वत्र कोरोनाच संकट असतांना शासन स्तरावर आरोग्यासाठी लाखो रुपये खर्च करत आहे.मात्र उमरा ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच याकडे बघ्याची भूमिका घेत आहेत.अशी संतप्त भावना संभाजी ब्रिगेडचे बालाजी सिरसाट यांनी व्यक्त केली आहे.
गावकऱ्यांना पाणी,रस्ते,वीज,आरोग्य,शिक्षण ह्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देने हे ग्रामपंचायत चे काम आहे.पण तसे होतांना मात्र दिसत नाही.आम्ही तुम्हाला गावाच्या विकासासाठी दिलेलं मतदान वाया गेलं,असच म्हणायची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा