Breaking

गुरुवार, ६ मे, २०२१

तांबवे गावचे युवक नेते सागरभैय्या खटके काळाच्या पडद्याआड,रुग्णालयात घेतला अखेरचा श्वातांबवे गावचे युवक नेते सागरभैय्या खटके काळाच्या पडद्याआड,रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..!



*तांबवे गावचे युवक नेते सागरभैय्या खटके काळाच्या पडद्याआड,रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..!*
टेंभुर्णी /प्रतिनिधी

*टेंभुर्णी पासून जवळ असलेल्या तांबवे टें - गावातील हिंदवी स्वराज्य ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष  सागर खटके वय (२८) यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले असल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे*
*गेल्या 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती*
*त्यामुळे  त्यांच्यावर अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.*
*शरीरातील ऑक्सिजन ची पातळी अधिक खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते पण प्रकृती उपचारांना साथ देत नसल्याने आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली*
*गावातील गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहीले जायचे. प्रत्येक दिवाळी सणाला तांबवे गावच्या  परिसरातील गोरगरीब व दलित समाजातील अनेकांना दिवाळीसाठी तेलाचा डबा गहू तांदूळ देऊन दिवाळी साजरी करण्यासाठी मदत करत असेल त्यामुळे त्याला सागर भैय्या म्हणून चांगले गावात ओळख होती त्याचा स्वभाव मनमिळाऊ  व राजकारणाची प्रचंड आवड असल्याने परिसरात त्यांचा संपर्क दांडगा होता.*दरम्यान त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण तांबवे व परिसरावर शोककळा पसरली आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा