*आ. गोरे यांनी मायणी मेडिकल कॉलेजच्या संदर्भात चुकीची माहिती पसरवु नये- आप्पासाहेब देशमुख*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
दोन दिवसापूर्वी म्हसवड येथे झालेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी माण-खटाव चे आ.जयकुमार गोरे यांनी मायणी मेडिकल कॉलेजच्या संदर्भात जी काय वल्गंना केली ती पूर्णपणे चुकीची असून सत्य परिस्थिती जनतेला माहित नाही. त्यामध्ये त्यांनी मायणी मेडिकल कॉलेज गेली ५ वर्षे बंद होते व ते मीच चालू केले हे त्यांचे म्हणणे साफ खोटे असून आ. गोरे चुकीची माहिती जनतेत पसरवु नका. असा इशारा पत्रकाराशी बोलताना माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी दिली.
मायणी मेडिकल कॉलेज ची स्थापना १९९९-२००० साली झाली असून त्यामध्ये बी.ए.एम.एस नर्सिंग कॉलेज व अद्यावयत हॉस्पिटल सुरु केले त्या दरम्यान संस्थेसाठी लागणाऱ्या जमिनी खरेदी करण्याचे काम सुरु होते. सन २०१२-२०१३ साली एम.बी.बी.एस साठी परवानगी मिळाली. त्यासाठी लागणाऱ्या सरकारी नियमानुसार अद्यावत इमारत लागणारी जमीन व सुसज्ज हॉस्पिटल या सर्व गोष्टी ची पूर्तता केल्या नंतर च परवानगी मिळाली. यासाठी देशमुख कुटुंबीयांनी स्व:ताजवळ असणारे सर्वस्व पणाला लावून व काही सहकार्यांच्या मदतीने तसेच काही वित्तीय संस्थाचे कर्ज उपलब्ध करून हि संस्था सुरु केली. एम.बी.बी.एस. कॉलेज २ वर्ष यशस्वी चालवले त्या काळात खटाव-माण तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी व कडेगाव तालुक्यातील रुग्णावर मोफत उपचार व औषधे उपचार केले दरम्यान शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत घेतली नाही. नंतर काही तांत्रिक अडचणी मुळे २०१४-२०१५ ची बॅच चे प्रवेश अनियंत्रित केले गेले. या कालावधीत संस्थेसाठी जमिनी खरेदी केलेल्या तसेच बांधकामासाठी केलेला खर्च हॉस्पिटलसाठी लागणारे साहित्य कर्मचाऱ्यांचे पगार यासाठी लागणारा वित्तीय पुरवठा खंडित होत गेल्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत सापडली गेली.
कालांतराने सुप्रीम कोर्टाने दंड स्वरुपात ठोठवलेली २० कोटी रक्कम शासनाने संस्थेकडून वसूल करण्यास सुरवात केली या कालावधीत संस्थाचे असणारे देणे, कर्मचाऱ्यांचे पगार यामध्ये खंड पडत गेल्यामुळे संस्थेला आर्थिक मदतीची गरज होती या दरम्यान माणचे आमदार यांनी तत्कालीन सरकार मधील भाजप च्या दोन वरिष्ठ मंत्र्यांना हाताशी धरून मायणी मेडिकल कॉलेज मला मिळवून देणार असाल तर मी भाजप मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार आहे असे सांगितले. त्यानंतर त्या वरिष्ठ मंत्र्यांनी त्या दिशेने वाटचाल सुरु केल्यानंतर संस्थेचे संस्थापक डॉ.एम.आर. देशमुख यांच्याशी मध्यस्थी मार्फत संपर्क करून मी सदर कॉलेज वर असणारे आर्थिक देणे भागवण्यास तयार आहे असा शब्द दिला एकंदरीत संस्थेची असणारी अडचण व महाराष्ट्र शासनाने केलेल्या दंड आकारणी वसुली व जप्तीची वरिष्ठ मंत्र्यांकडून व आमदारा कडून अधिकाऱ्यावर दबाव असल्यामुळे सतत तसेच संस्थेस जप्तीची भीती दाखऊन डॉ.एम.आर.देशमुख व सहकाऱ्यांना आर्थिक देणे भागवणे, वसुली थांबवतो असा शब्द देऊन संस्थेत प्रवेश केला. आज आमदारांनी संस्थेत प्रवेश करून ३ वर्ष १ महिना होऊन सुद्धा संस्थेत प्रवेश करून लोकांची असलेली देणी, वित्त संस्थेची असलेली देणी यापैकी आज पर्यंत दिला गेलेला नाही किवा संस्थेच्या पुढील बांधकामासाठी एक वीट सुद्धा लावलेली नाही.
आ. गोरे संस्थेत तुम्हि येण्या अगोदर पासून आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, व हॉस्पिटल हे चालू होते व आज हि चालूच आहे. तुम्ही येण्यागोदर एम.बी.बी.एस. कॉलेज बंद होते ते आज हि बंद आहे. तुम्ही येण्यागोदर लोकांची जी देणी होती ती आज हि तशीच आहेत. तुम्ही आल्यापासून संस्थेच्या भिंतीना व जुन्या मॅनेजमेंट ला चुना लावण्या व्यतिरिक्त काही केलेले नाही.
सध्या मायणी मेडिकल कॉलेज वरती कोविड सेंटर सुरु असून या कोविड सेंटर वरही शासनाला व सर्वसामान्य जनतेला चुना लावण्याचे काम सुरु आहे. त्याबरोबर एक वर्षापासून थकीत वीज बिल २७ ते २८ लाख आहे. कालांतराने त्याचा हि लेखा झोका जनतेसमोर येईल तुम्ही जनतेचा कळवळा आणून जनतेसाठी काय केले आहे ते दाखवा. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे बंद करा. फक्त लोकांच्या संस्था हडप करून मालक असल्याचा आव आणू नका. स्वताच्या पैश्यातून साधी पिठाची चक्की ज्याला उभी करता आली नाही त्यांनी मायणी मेडिकल कॉलेज सारखी संस्था फुकट हडप करणे सोपे नाही हे लक्षात ठेवावे. या विरोधात आम्ही कायदेशीर लढाई सुरु केली असून लवकरच तुम्हाला तुमची जागा दाखऊन देऊ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा