Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे विशेषज्ञ उपलब्ध करून देणे या मागणीसाठी राज्यमंत्री यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले*



*जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे विशेषज्ञ उपलब्ध करून देणे या मागणीसाठी राज्यमंत्री यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले*

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत असून 7608 रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण 44698 रुग्ण रुग्ण कोरोना बाधित झाले असून एकुण 1032 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूचा दर 2.32% असून मराठवाडयात सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात 60 आयसीयू बेडसाठी केवळ 2 भीषक (फिजिशियन )व 2 भूलतज्ञ आहेत. रुग्ण संख्येच्या प्रमाणात डॉक्टर्स व इतर सपोर्टींग स्टाफ फारच कमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सीजन, बेड व आयसीयू ची गरज वाढली असून उपचारासाठी विशेषज्ञांची अत्यंत आवश्यकता आहे.
तरी जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय वौद्यकीय केंद्रासाठी विशेषज्ञ डॉक्टर्स व सपोर्टींग स्टाफ तातडीने उपलब्ध करुन द्यावा, ही 
मागणी भारतीय जनता युवा मोर्चेचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार मा.ना.श्री. संजय बनसोडे ,
राज्यमंत्री - पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) यांच्याकडे पत्रद्वारे केली. यावेळी  विशाल पाटील, प्रीतम मुंडे , प्रसाद मुंडे, स्वप्नील नाईकवाडी उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा