Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

नातेपुते ग्रामीण रूग्णालयात कोविड* *सेंटर सुरू करण्याची मागणी* *अक्षय भांड यांनी दत्ता मामा भरणे यांना केली*



*नातेपुते ग्रामीण रूग्णालयात कोविड* *सेंटर सुरू करण्याची मागणी* *अक्षय भांड यांनी दत्ता मामा भरणे यांना केली* 
रेडा ,प्रतिनिधी शशिकांत सोनटक्के
दि,9
 सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.दत्ता मामा भरणे यांची इंदापूर येथे अक्षय भांड यांनी भेट  घेतली यावेळी नातेपुते ग्रामीण  रूग्णालयात (DCHC) कोविड सेंटर उभा करण्याची तातडीची मागणी मामांना  केली त्याबाबत लवकरच नातेपुते ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटर उभा करण्याबाबत मामांनी संबधीत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
माळशिरस तालुक्यात रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे नातेपुते म्हणजे माळशिरस तालुका पश्चिम भागामध्ये कोविड सेंटर  उभा राहण्याची गरज आहे त्यामुळे अनेक लोकांना त्याचा लाभ होईल असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पै.अक्षय दादा भांड यांनी व्यक्त केले
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सहकारी रियाज शेख,डॉ. पाटील,व विलास भोसले हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा