*प्रा.अजय शेटे यांची आत्मनिर्भर च्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा.अजय वसंतराव शेटे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा.शेटे यांची निवड संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजीराव देवकर यांच्या शिफारशीवरून राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुकेश शर्मा, महामंत्री भगवानराव बागुल, अनिल कचरे यांनी हि निवड जाहीर केली आहे.
हि निवड झाल्यानंतर प्रा.शेटे म्हणाले, पंतप्रधान जनकल्याण योजनांचा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मिळवून देण्याचा आपण मनापासून प्रयत्न करणार आहे. या निवडीबद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, माजी आ.डॉ.दिलीपराव येळगावकर, जि.बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पाठक, महिला अध्यक्षा सुलोचना चौधरी, भाजपा, रा.स्व.संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी व वडूज परिसरातून प्रा.शेटे यांचे अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा