Breaking

मंगळवार, २९ जून, २०२१

जाफर पटेल यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या माढा तालुकाध्यक्षपदी निवड



जाफर पटेल यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या माढा तालुकाध्यक्षपदी निवड
माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथील प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यवसायायिक आणि जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे खंदे समर्थक जाफर इसाक पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या माढा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे पत्र माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील व कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

नियुक्तीनंतर नूतन तालुका अध्यक्ष जाफर पटेल यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे,विविध योजना व समाजोपयोगी कामे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असून या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी,माढेश्वरी अर्बन बँकेचे संचालक गणेश काशीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र भांगे,युवकचे तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमजान पटेल,बक्तावर पटेल,हाजू सय्यद,बाबा पटेल,शब्बीर पठाण,वजीर सय्यद, हरुण शेख, मौलाना सय्यद यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

फोटो ओळी - अंजनगाव उमाटे ता.माढा येथील जाफर पटेल यांना नियुक्तीचे पत्र देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील,रामभाऊ शिंदे व इतर मान्यवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा