मुख्याध्यापिका कलावती पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाडे लावून वाढदिवस साजरा
पेण प्रतिनिधी/
पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कलावती शशिकांत पाटील
यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सुपूत्र सामाजिक कार्यकर्ते हितेश पाटील व पत्रकार स्वप्निल पाटील यांच्या वतीने पेण कुंभार तलाव परिसरात वृक्षारोपणाचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी पेण आरटीओचे निवृत्त अधिकारी रामभाऊ गोरीवले यांसह प्रभाग क्रमांक एक मधील महिला वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी लावलेल्या झाडांमध्ये फणस, कडीलिंबू,वड, बाभूळ,बदाम आदी प्रकारच्या झाडांचा समावेश होता.कोरोनाच्या महामारीत अनेक जण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दगावले गेले आहेत. या गोष्टीचा विचार करून सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाडे लावून हा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवून हा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी फक्त वृक्ष लावणे नाही, तर ते मोठे होईपर्यंत त्यांची निगा राखण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे हितेश पाटील यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा