Breaking

शनिवार, १९ जून, २०२१

मायणी पक्षी संवर्धन मधून येरळवाडी मध्यम प्रकल्प वगळावा*खटाव राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोलेना निवेदन.



*मायणी पक्षी संवर्धन मधून येरळवाडी मध्यम प्रकल्प वगळावा*
खटाव राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोलेना निवेदन.

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

          मायणी पक्षी संवर्धन राखीव समूह क्रमांक २ मधून येरळवाडी मध्यम प्रकल्प वगळावा व ३५० उपसासिंचन योजना, नळपाणी पुरवठा योजना, गाळपेर, मासेमारी व पशुधन यांचे हक्क कायमस्वरूपी राहवेत या मागणीचे निवेदन खटाव तालुका राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीच्यावतीने मुंबई येथे राष्ट्रीय कॉग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या शासकीय निवासस्थानी देण्यात आले. 
         दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येरळवाडी मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा होत असलेल्या औंधसह २१ गावे, खातवळसह १२ गावे, वडूज नगरपंचायतसह ६ गावे, मायणीसह ६ गावे, स्थानिक येरळवाडी, बनपूरी, सुर्याचीवाडी, अंबवडे, नढवळ, गुरसाळे, गणेशवाडी, कातरखटाव व एन कूळ इत्यादी ५० गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. तसेच टंचाई काळात खटाव व माण तालुक्यात ५० ते ६० गावांना खात्रीशीर टँकर फिडींग पॉईट आहे.
          जर येरळवाडी व धरणातील बुडीत क्षेत्र वनविभागाच्या पक्षी संवर्धनासाठी आरक्षित केल्यास या सर्व योजनेसह शेतकऱ्यांच्या ३५० पाणी उपसा जलसिंचन योजनेवर वनविभागाचे अनेक निर्बंध येतील. त्यामुळे धरणातील जलाशयावर अवलंबून असणाऱ्या सर्व नागरिकांना भविष्यात अनेक अडचणी येतील. त्यामुळे महसूल व वन विभागाने महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ - अ अ साधारण क्रमांक ४० दि. १५ मार्च २०२१ काढलेल्या अधिसूचनेस आमचा तीव्र विरोध आहे.
          १५ मार्च २०२१ चे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग ४ - अ , असाधारण क्रमांक ४० मध्ये बदल करून मायणी पक्षी संवर्धन राखीव, समूह क्रमांक २ येरळवाडी तलाव एकूण क्षेत्र ६३३ .५७ हे.आर वगळून सर्व बाधित शेतकऱ्यांना मिळावा व तशी नवीन अधिसूचना जारी करावी. राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, तालुकाध्यक्ष डॉ.विवेक देशमुख, वडूज बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, माजी जि प सदस्य मानाजी घाडगे, युवकचे तालुकाध्यक्ष विराज शिंदे, नरेंद्र देसाई, विशाल देवकर आदिंच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा