Breaking

शुक्रवार, १८ जून, २०२१

अग्नीपंख फौंडेशनने कोविड काळातील स्वंयसेवकांचा केला सन्मान....


अग्नीपंख फौंडेशनने कोविड काळातील स्वंयसेवकांचा केला सन्मान....
श्रीगोंदा =नितीन रोही

 अग्नीपंख फौंडेशनने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  सामाजिक जाणीवेतून 15कोविड सेंटर सुरू करुन 3 हजार 168कोरोना बाधित रुग्णांना जीवदान देणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील  कोविड सेंटर व स्वंयसेविकांचा सन्मान प्रशासकीय अधिकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
आरोग्य विभागाचा अजेंडा  घरा घरात पोहोचविणाऱ्या आरोग्यसेविकांच्या प्रतिनिधी म्हणून स्नेहल सोनटक्के दिपाली शेलार सुनंदा थोरात गिता राऊत निता शिंदे सुरेखा चितळकर यांचे अधिकाऱ्यांचा  सन्मान करण्यात आला या  अनोख्या उपक्रमाने आरोग्यसेविकांच्या डोळ्यातुन आनंदाचे अश्रू तरारळले. 

पोलिस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव म्हणाले की माझ्या जीवनात मोठ्या माणसांकडून अनेक सत्कार झाले पण आरोग्य विभागात अतिशय प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेविकेंच्या हस्ते माझा सन्मान झाला हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे 

यावेळी तहसीलदार प्रदिप पवार, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, महाराष्ट्र बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा,हेमंत नलगे, सुनील गायकवाड, प्रमोद म्हस्के यांची भाषणे झाली व प्रास्ताविक प्रा फुलसिंग मांडे यांनी केले 

यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे,अप्पर तहसीलदार चारुशीला पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर, नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर, योगेश भोयटे,नगरसेवक सतीश मखरे,पं-स-सदस्य कल्याणी लोखंडे,दिलीप काटे,अंजली बगाडे,शिवदास शिंदे,मधुकर काळाणे,बी बी गोरे,किसन वऱ्हाडे आदिंसह पत्रकार बंधु उपस्थित होते. सुत्रसंचालन पत्रकार विशाल चव्हाण यांनी केले.

चौकट ,

आरोग्य विभागात शेवटचा घटक म्हणून आरोग्यसेविका आशास्वंयसेविका काम करत असतात  अग्नीपंख फौंडेशनने आपल्या प्रमुख अतिथीचा बहुमान दिला आमच्या हस्ते अधिकाऱ्यांचा सत्कार केला हा आमचा बहुमान नसुन सर्व आरोग्यसेविका व आशास्वंयसेविकांचा बहुमान आहे. अशी प्रतिक्रिया वांगदरीच्या आशास्वंयसेविका गीता राऊत यांनी व्यक्त केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा