Breaking

शुक्रवार, १८ जून, २०२१

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उस्मानाबाद च्या वतीने पिंपळा खुर्द येथील विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन


*अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उस्मानाबाद च्या वतीने पिंपळा खुर्द येथील विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन*


अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती उस्मानाबादच्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या गावातील विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले यामध्ये १)  मौजे पिंपळा खुर्द येथील मंजूर करण्यात आलेले व जमीन अधिग्रहण केलेले महावितरणचे नवीन सब स्टेशन तात्काळ चालू करण्यात यावे, २) मौजे पिंपळा खुर्द येथील भ्रष्टाचारी रेशन दुकानदार यांची प्राधिकारपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे, ३) मौजे पिंपळा खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा,  ४) सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काटी- सावरगाव- सुरतगाव-पिंपळा खुर्द- देवकुरळी या रस्त्याचे दुरुस्ती करण्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे न करता निकृष्ट दर्जाचे झाले आहे, त्याची स्वतंत्ररीत्या चौकशी करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत, शंकर भगवान कदम,धनंजय जांबुवंत डांगे, यांनी कळवले आहे.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उउस्मानाब

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा