*तुळजापूर शहरांमध्ये लोक सहभागातून लसीकरण मोहीम यशस्वी - नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी २०३ विक्रमी लसीकरण*
दिनांक २३ जून २०२१,रोजी तुळजापूर शहरातील विविध प्रभागात प्रतिदिनी लसीकरण होत असून ते यशस्वी होण्यासाठी लोकसहभागाचा फार मोठा आहे.
यामध्ये नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, सर्व नगरसेवक, न.प.प्रा. शाळा. क्रमांक. १,२,३ मधील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील सर्व कर्मचारी वृंद यांचा सिंहाचा वाटा असल्याचे गौरव उद्गगार नगर परिषद अध्यक्ष सचिन रोचकरी यांनी झुंजार हनुमान मंदिर दिपक चौक येथील प्रभाग क्रमांक ७ व ८ येथील लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
प्रास्ताविक महेंद्र कावरे यांनी तर सूत्रसंचालन भोलानाथ लोकरे यांनी केले आभार प्रदर्शन श्रीनाथ शिंदे यांनी मानले या वेळी संपत जळके सर यांनी लसीकरण येणाऱ्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन नगरपालिका अध्यक्ष मुख्याधिकारी सर्व नगरसेवक व सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आनंद दादा कंदले यांनी आपल्या मनोगतामध्ये योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.यावेळी एकूण *203* लोकांना लस देण्यात आली.
लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना प्रोत्साहन म्हणून नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या वतीने भेटवस्तू म्हणून टिफिन डबा, अल्पोपहार चहा चे वाटप करण्यात आला.
सदरील लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी , नगरसेवक पंडित जगदाळे, विजय कंदले, किशोर साठे, माजी नगरसेवक अविनाश गंगणे ,संतोष पवार,नाना लोंढे ,अभिजित कदम, रुग्ण समितीचे सदस्य आनंद कंदले, न.प. कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, दिलिप सोनवणे, संपत जळके, संजय पैलवान ,रमेश काळे, नानासाहेब डोंगरे,सतीश हुंडेकरी ,उपजिल्हा रुग्णालय येथील लसीकरण प्रमुख सुलक्षणा मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लसीकरण प्रत्येक प्रभागातील नगरसेवक माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक हे परिश्रम घेत असून त्यामुळे लसीकरणाचा रेट तुळजापूर शहराचा वाढता आहे असे गौरवोद्गार उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंचला बोडके,जाधव साहेब यांनी लसीकरण केंद्र भेटीदरम्यान काढले.
सदरील लसीकरण यशस्वी करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी व नगर परिषदथ प्राथमिक शाळा २ चे मुख्याध्यापक बाळासाहेब जेटीथोर, सुरजमल शेटे, सतीश यादव, महेंद्र पाटील, गणेश रोचकरी,शिवा डाके ,शालिनी माने, भोलानाथ लोकरे, श्रीनाथ शिंदे, विनोद नेपते, महेश भांजी, विकास शिंदे, सोमनाथ इंगळे, संभाजी भांजी, अंकुश शिंदे , सचिन ठोंबरे, रोहन पांढरे, नितीन भांजी, योगेश रोचकरी, नितीन धोत्रे ,हणमंत पुजारी,अमोल सोनवणे, समाधान जगताप , अझर तांबोळी त्यांनी परिश्रम घेतले. लसीकरण यशस्वी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील आरोग्य पर्यवेक्षक पांडागळे जयप्रकाश, हिरेमठ जयप्रकाश, माने एम. एम., अडसूळ .ई.ए. करडे ,गालफाडे, चव्हाण पार्वती यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा